"सामान्य क्रौंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|कुलंग thumb|कुलंग कुलंग या पक्षाला मराठ...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(काही फरक नाही)

१०:००, १७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

कुलंग या पक्षाला मराठीमध्ये कुलंग(बाजनामा)(पु.)म्हणतात.इंग्रजीमध्ये Eastern Common Crane म्हणतात.हिंदीमध्ये कुरुंच,कुंज,कूर्च असे म्हणतात.संस्कृतमध्ये क्रौञ्च,पुष्कर,प्राच्य क्रौञ्च,लक्ष्मण असेही म्हणतात.गुजरातीमध्ये करकरो,कुंज म्हणतात.तेलगुमध्ये कूलम,कूलंग,कूलंग कोंग म्हणतात.

कुलंग
कुलंग

ओळख

दिसायला सारसाप्रमाणे.परंतु आकाराने लहान.डोळे,गळा आणि मानेवरचा रंग काळा.डोळ्यांपासून गळ्याखाली जाणारी रुंद पट्टी पांढरी.मानेमागचा रंग पांढरा.कपाळाच्या खालच्या भागावर तांबडा डाग.सर्व पंख आणि शेपटींच्या पिसांचा रंग काळा.पाय काळे.उदी रंगाच्या केसांसारख्या बारीक पिसांनी शेपटी झाकलेली असते.नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

वितरण

हिवाळी पाहुणे.पाकिस्तान आणि उत्तर भारत.पुर्वीकडे बंगाल,महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश.पॅलिआर्क्टिक भागात मे-जून या काळात वीण.

निवासस्थाने

सरोवरे,नद्या,शेतीचा प्रदेश आणि भातशेती.

संदर्भ

पक्षिकोश लेखक:मारुती चितमपल्ली.