"श्रीपाद दामोदर सातवळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७१:
== बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २)==
या पुस्तिकांमध्ये व्यक्तीच्या घडणीसाठी उपयुक्त असे विचार पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहेत आणि मुलांनी ते विचार पाठ करावेत असे त्यांनी सुचविले आहे.पण ते केवळ पाठांतर न होता त्याचा आशय समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे या हेतूने या पुस्तिकांमध्ये त्या विचारांचा अर्थही जाणीवपूर्वक दिला आहे. तो समजला तर त्यानुसार आचरण करून स्वत:चे व्यक्तिमत्व अधिक समृध्द करणे लहान वयाच्या मुलांना आणि त्यांच्या पालक व शिक्षकांना सोपे जाईल असा भाव यामध्ये नोंदविला आहे.
प्रथम भागामध्ये प्रामुख्याने तैत्तिरीय उपनिषदातील विचारांचा समवेश आहे. त्याजोडीने यजुर्वेद आणि अथर्ववेद संहितेतील अनुक्रमे एकेक मंत्र समाविष्ट आहे. द्वितीय भागात, ऋग्वेद, यजुर्वेद या संहितांमधील,ऐतरेय ,शतपथ , गोपथ या ब्राह्मण ग्रंथातील , ईश, केन, कठ, बृहदारण्यक,श्वेताश्वतर या उपनिषदातील निवडक सुवचनांचा समावेश केलेला आहे. <ref>बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २) पं. सातवळेकर श्रीपाद, स्वाध्याय मंडळ पारडी.</ref>
मुलांसाठी धर्म-शिक्षण असे म्हणत असताना धर्म म्हणजे संपूर्ण मानवी जीवनाचा एक विशेष प्रकारचा उच्च दृष्टीकोण. शिक्षण असे म्हणत असताना पं . सातवळेकर यांनी नोंदविले आहे – नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य भारतीय अध्यात्मविद्येत आहे. वेदाने ते सांगितले आहे म्हणून ते अंतिम आहे असे मी मानीत नाही. ते मूळ आहे. सर्वानी त्यात वाढ करायची आहे आणि व्यक्ती-समाज-राष्ट्र उन्नतीचा मार्ग म्हणून त्यातील बोधही पहायचा आहे. <ref>बालकोंकी धर्म शिक्षा ( भाग १ आणि २) पं. सातवळेकर श्रीपाद, स्वाध्याय मंडळ पारडी.</ref>