"रंकाळा तलाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
[[राज्य महामार्ग ११५ (महाराष्ट्र)|राज्य महामार्ग ११५]] याच्या काठावरुन गगनबावड्याकडे जातो.
 
कोल्हापूरमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणून रंकाळा तलावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या रमणीय ठिकाणी संध्याकाळच्या वेळी कोल्हापूरमधील बहुसंख्य नागरिक मोठया संख्येने फिरावयास जातात. रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरची "मरीन ड्राईव्ह" असा केला जातो. रंकाळा तलाव शहराच्या नैऋत्य टोकाला आहे. त्याचे क्षेत्र सुमारे २०२.३४ हेक्टर असून खोली जवळजवळ १०.६७ मीटर आहे. हल्ली तलावाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणले जाते. तलावातील पाणी सोडण्यासाठी एक दरवाजा बांधला आहे. तळयाकाठी शालिनी राजवाडा असून राजवाडयाच्या भव्यतेमुळे रंकाळयाच्या वैभवात अधिकच भर पडली आहे. पूर्व बाजूला आणि थोडयाफार अंशी खुद्द तळयामध्ये संध्यामठ आहे. हा मठ म्हणजे प्रशस्त मंडप असून त्याची बांधणी हेमांडपंथी पद्धतीने केली आहे. मठाची वास्तू हल्ली सुस्थितीत नाही. पावसाळयामध्ये तलाव जेव्हा भरून वहातो तेव्हा संध्यामठ पूर्णपणे पाण्यात बुडतो. रंकाळयाजवळ पद्‌माराजे उद्यान आहे. पूर्वीच्या काळी कोल्हापूरच्या राजांना तलावामध्ये विहार करणे सुलभ व्हावे म्हणून छोटया छोटया नावांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या तलावामध्ये मासे पकडण्याचा हक्‍क फक्‍त राजांचा होता. आता तलावात विहार करण्यासाठी महानगरपालिकेने सोय केली आहे. तळ्याला रंकाळा हे नाव रंक भैरव या देवाच्या नावावरून देण्यात आलेले आहे. रंक भैरव महालक्ष्मीच्या अतिशय मर्जीतला होता असे म्हणतात. रंकाळा तलावाची सुरूवात त्याजागी दगडाची एक खाण खणण्यापासून झाली. जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य याने जी ३६० जैन मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका धरणीकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली. हल्ली या तळयाला उत्तरेकडे असलेल्या दोन ओढ्यातून पाण्याचा पुरवठा होतो. १८८३ पासून रंकाळा तलावाच्या पाणीपुरवठयात बरीच सुधारणा झाली. शहराच्या दिशेने जो जुना बंधारा होता त्यापेक्षाही अधिक मजबूत बंधरा नव्याने बांधण्यात आला. हा बंधारा अजूनही चांगल्या स्थितीत आहे. परंतु त्याला लागून असलेल्या रस्त्यावर वारंवार भर टाकली गेल्यामुळे बंधाऱ्याची उंची तुलनेने कमी झाल्यासारखी वाटते. रंकाळा ही कोल्हापूरच्या प्राचीन सहा वसाहतीपैंकी एक असून तेथे वर नमूद केलेला संध्यामठ तसेच एक नंदीची मोठी मूर्ती असलेले देवालय आहे. ब्रह्मपूरीशी संबंध नसलेले रंकाळा हे त्यावेळी एक स्वतंत्र खेडे होते. या भागाला पूर्वी नवा बुधवार असे नाव होते. शहराची वाढ होत गेली तेव्हा रंकाळा भागही कोल्हापूरात समाविष्ट झाला. काही मानवी हस्ताशेपामुळे रंकाल्याचे पाणी दुषित होत चालले आहे.
(Ref: [http://www.kolhapurphoto.com www.kolhapurphoto.com]) रंकाळ्याच्या काठावर संध्यामठ बांधला आहे. रंकालायाच्या उत्तर दिशेल " शालिनी प्यालेस " आहे.
 
१३

संपादने