"अगाशिव लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६६४ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हीनयान पंथाच्या बौद्ध भिख्खूनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या नैर्ऋत्येला असलेल्या अगाशिव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत आहेत. त्यामध्ये ६ [[चैत्यगृहे]] (प्रार्थनास्थळ) व इतर [[विहार]] स्वरूपात आहेत.
 
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक अगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात. या डोंगरावरून कराड शहराचे सुंदर दृश्य दिसते. लोक तिथे फिरण्यासाठी जातात आणि या लेण्यांच आनंद घेतात . बहुदा पावसाळ्यात तिथे लोक जातात .
 
या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भ शास्त्रात प्राविण्य मिळवलेले अनेक लोक येतात व लेण्यान विषयी माहिती मिळवतात.
 
==स्थान==
जखीणवाडी हे कराडपासून साधारण २ किमी अंतरावर साधारण १,००० लोकवस्ती असलेले एक गाव आहे. अगाशिवच्या डोंगरावर ही लेणी असल्याने ह्यांना अगाशिवची लेणी असेही म्हणतात.
 
गावात मळाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. जवळच दत्ताचे एक नवीन देऊळ असून ते देखील प्रेक्षणीय आहे.