"तंत्रज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 123 langlinks, now provided by Wikidata on d:Q11016
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Astronaut-EVA.jpg|thumb|right|250px|इ.स.च्या २०व्या शतकापर्यंत पृथ्वीचे वातावरण ओलांडून अंतराळात प्रवेशण्याइतपत मानवी तंत्रज्ञानाने झेप घेतली]]
'''तंत्रज्ञान''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Technology'', ''टेक्नॉलजी'') म्हणजे [[अवजार|अवजारे]], [[यंत्र|यंत्रे]], त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय.
प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने [[आग]] चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर [[चाक|चाकाचा]] शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात [[छपाईचे तंत्रज्ञान]], [[टेलिफोन]], [[इंटरनेट]] या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे केल्याने मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे.