"कुष्ठरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: आणी → आणि (2)
ओळ ३:
 
==वर्णन==
हॅन्सन या शात्रज्ञाच्या नावावरून कुष्ठरोग ओळखला जातो. 1878 साली त्याने या रोगाचा कारक “मायकोबॅक्टेरियम लेप्रि” चा शोध लावला. या जिवाणूच्या संसर्गाने त्वचेमध्ये अस्वाभाविक बदल होतात. या बदलास विकृतिस्थल म्हणतात. त्वचेवरील हे भाग वेड्यावाकड्या आकाराचे आणि वैशिष्ठ्यपूर्ण असतात. त्यांची कड गडद रंगाची आणि मध्यभाग फिकट रंगाचा दिसतो. मायकोबॅक्टेरियम लेप्रि कमी तापमानास वाढतो. त्यामुळे त्वचा , अंतत्वचा आणि चेता यामध्ये तो वाढतो. चेतामध्ये वाढल्याने चेता नष्ट होतात आणि त्या भागाची संवेदना नाहिशी होते. हातापायांच्या बोटांची संवेदना नाहिशी झाली म्हणजे त्याना इजा होण्याची शक्यता वाढते. इजा झाल्यास जखमामध्ये जिवाणू वाढतात आणि उघड्या जखमा होतात. उघड्या जखमांचे पर्यावसान गँग्रीनमध्ये झाल्याने उती मृत होतात. अशाने अवयव विद्रूप होतात. शरीर विद्रूप झाल्याने दोन हजार वर्षापूर्वी बायबल काळात कुष्ठरोग हा ओंगळवाणा रोग अशी त्याची ख्याती होती. बायबलच्या जुन्या करारात याचा उल्लेख आहे. या काळात कुष्ठरोगाचे रुग्ण समाजापासून वेगळे ठेवले जात. त्यांच्यासाठी वेगळ्या वस्त्या असत. अजून समाजात या रोगाबद्द्लरोगाबाबत हीनहिन भावना आहे. हा रोग वेगाने पसरणारा संसर्गजन्य नाही. त्याची वाढ अत्यंत सावकाश होते. घरामधील रुग्णाचा वावर आणि कुष्ठरोग्याची तपासणी करणारा वैद्यकीय कर्मचारी यांच्यापासून तो पसरत नाही. तो पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगावरील उपचार दीर्घ मुदतीचे आणि बहु उपचारी आहेत.
 
==रुग्ण संख्या==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुष्ठरोग" पासून हुडकले