"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
अजा= शेळी. चैत्र मासी कोणत्याही शुभ दिवसापासून तीन दिवस नक्त (पाणी न वापरता शिजवलेले अन्न) भोजन करतात. दुधाने भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची भाकरी हे भोज्य अन्न समजतात. भोजनापूर्वी चंदनाने पार्वतीची दशभुज प्रतिमा रेखतात. ज्वालामुखी या नावाने तिची पूजा करतात. तिसऱ्या दिवशी पाच दुधाळ शेळ्या ब्राह्मणास दान देतात. दानाचे फल-मोक्ष.
 
===आनंदव्रत===:
या व्रतात अयाचित जलदान करावयाचे असते. व्रतावधी चैत्रादी चार महिने. व्रताच्या अंती अन्न, वस्त्र, तिलपात्र व सुवर्ण यांचे दान करावयाचे असते. फल-ब्रह्मलोकाची प्राप्ती व कल्पान्ती राजपद.
 
===तिथीपूजन===:
प्रतिपदादी प्रत्येक तिथीला तिथिस्वामीची पूजा करुन हे व्रत केले जाते. त्याचे विधिविधान असे- प्रातःस्नान उरकून वेदीवर अथवा चौरंगावर लाल वस्त्र पसरून त्यावर अक्षतांचे अष्टदल काढतात. ज्या दिवशी जी तिथी असेल त्या दिवशी त्या तिथीच्या स्वामीची सुवर्णमूर्ती अष्टदलाच्या मध्यभागी स्थापन स्थापन करुन तिची पूजा करतात.
 
५७,२९९

संपादने