"ऑक्टोबर क्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
१९१७ च्या प्रारंभी लाखो सैनिक कोण्त्याही परवानगीची वाट न पाहता, कोण्ताही नेता, अधिकारी नसतांना स्वतःच्या शस्त्रांसह युद्धभूमीतून मागे हटले. सैनिक, कामगार, शेतकरी - सर्वसामान्य जनता रस्त्यावर जमली. फार मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती तयार झाली. या गडबडीतच त्सार निकोलसने मंत्रीपरिषदेचे (ड्यूमा) विसर्जन केले, सर्व सत्ता स्वतःकडे एकवटली. समाजवादी पक्षासह ड्यूमाचे सदस्य एकत्र आले आणि १४ मार्च रोजी प्रिंस जॉर्जी लवोव यांच्या नेतृत्वाखाली उदारमतवादी आणि मवाळ समाजवादी यांचा समन्वय साधला गेल्याने एक मोठी शक्ती एकत्र झाली. लवोव यांच्या पुढाकाराने हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. कोणताही पर्याय समोर न राहिल्याने १५ मार्च १९१७ ला त्सार निकोलसने राज्यत्याग केला व सुमारे तीन शतके रशियावर राज्य करणाऱ्या रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली.
 
हंगामी सरकार आणि समाजवादी विचारांच्या लोकांमध्ये लवकरच मतभेद सुरू झाले. लोकांच्या परिस्थितीबद्दल हंगामी सरकारने हालचाली सुरू केल्या नसल्याने पुन्हा क्रांती होऊन रशियाचे नेतृत्व नव्या लोकांकडे देण्याची चिन्हे दिसु लागली. समाजवाद्यांच्या दबावामुळे [[सायबेरिया|सायबेरियात]] हद्दपारीची शिक्षा भोगणाऱ्या [[जोसेफ स्टालिन]] आणि रशियाबाहेर राहणाऱ्या [[लेनिन]], [[लेओन ट्रॉट्स्की|ट्रॉट्स्की]], कामनेव्ह, रादेक या नेत्यांना रशियात परत येता आले. हंगामी सरकार विरूद्ध लेनिनच्या नेतृत्त्वाने क्रांतीला जहाल वळण लागले. ताबडतोब आंतरिक युद्धबंदीची मागणी जोर धरू लागली. तसेच जमीनदार, उमराव यांच्याकडून जमिनी काढून त्या शेतकऱ्यांना वाटून देण्याच्या मागणीला समर्थन मिळू लागले.
 
जुलै १९१७ मध्ये हंगामी सरकारने आपली लोकप्रियता टिकविण्यासाठी जर्मनीवर आक्रमण केले पण त्यात सपशेल अपयश आले. मोठ्या प्रमाणात प्राणहानी, वित्त हानी मात्र ओढवून घेण्यात आली. हंगामी सरकारवरची नाराजी आणखी वाढली, बोल्शेविकांना समर्थन वाढले. २४ ऑक्टोबर १९१७ रोजी हंगामी सरकारविरूद्ध सशस्त्र उठाव झाला. सरकारच्या सहय्यासाठी सैन्य राजधानीत नव्हतेच त्यामुळे फारसा प्रतिकार झालाच नाही. २४-२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री विंटर पॅलेसवर बोल्शेविक चालून गेले. २५ ऑक्टोबरच्या सकाळापासून समाजवाद्यांनी एक एक करत राजवाडा, लष्कर, पोस्ट व तार घर, रेल्वे, बँक, शासकीय कार्यालये आपल्या ताब्यात घेतले.