"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १८:
सम्राट अशोकाच्या शाही आज्ञा आणि त्याच्या अन्य आलेखांचे बृहद शिलालेख, लघु शिलालेख, विशाल स्तंभालेख, लघु स्तंभालेख आणि गुंफा शिलालेख असे पाच प्रकारचे [[शिलालेख]] आहेत. चौदा बृहद शिलालेख शृंखला पाच ठिकाणी, सहा विशाल स्तंभालेख शृंखला सहा ठिकाणी (त्या पैकी टोपरा स्तंभावर सात लेख), एकोणीस ठिकाणी लघु शिलालेख, सहा लघु स्तंभालेख आणि तीन गुंफा-शिलालेख असे शिलालेख उपलब्ध झाले आहेत. या लेखांचे स्थळ आणि लेख-संख्या असे वर्गीकरण खालील प्रमाणे आहे.
 
चौदा बृहद शिलालेख शृंखला पाच ठिकाणी - गिरनार (१४), कालसी (१४), शहाबाजगढ (१४), मानसेहरा (१४) येरागुडी (१४), धौली (११ - ११,१२ व १३ शिलालेख वगळलेले), जौगड (११ - ११,१२ व १३ शिलालेख वगळलेले), सोपारा (८वा आणि ९वा फक्त). धौली आणि जौगड येथे शृंखलेव्यतिरिक्त प्रत्येकी दोन अधिकचे बृहद शिलालेख आहेत.
 
सहा स्तंभालेख शृंखला सहा ठिकाणी - दिल्ली (टोपरा) (सातवा अधिकचा स्तंभालेख फक्त याच स्तंभावर), दिल्ली (मेरठ), लोरिया (आराराज), लोरिया (नंदनगढ), रामपूर्वा आणि कौसंबी (अलाहाबाद).
 
लघु शिलालेख - अर्हुआरा, भाब्रु, बैरट, गुजर्रा, गविमठ, जतिंग (रामेश्वर), मास्की, पांगुरिया, रुपनाथ, सहसराम, उदेवगोलमबहापुर, ब्रम्हगिरी, रजुला मंदगिरी या ठिकाणी प्रत्येकी एक.
 
बहापूर, येरागुड्डी, नित्तूर, सिद्धपूर, सन्नतीउदेगोलम या ठिकाणी प्रत्येकी दोन. ब्रम्हगिरी आणि रजूला मंदागिरी या ठिकाणी प्रत्येकी तीन.
 
लघु स्तंभालेख - सारनाथ, कौसंबी, साँची, देविया (राणी), लुंबिनी आणि निगलिवा या ठिकाणी प्रत्येकी एक.
ओळ ४४:
== दगडी शिलालेख ==
=== सहाव्या दगडी शिलालेखाचा अनुवाद ===
देवानांप्रिय प्रियदर्शी राजा असे सांगतो. अतिशय अंतराळ झाला, (खुप कालावधी गेला) ज्यापूर्वी राज्यात आवश्यक कार्ये होत नव्हती, वा (कार्याची) माहिती ही मिळत नव्हती. म्हणून मी असे केले (अशी व्यवस्था केली) आहे. सर्व काळी, भोजन समयी, अंतःपुरात, शयनकक्षात, पशुशाळेत, घोड्यावर स्वार असेतो अथवा उद्यानात असेतो, सर्वत्र (कोणत्याही स्थळी-काळी) वृत्तदात्याने स्थिर होउन (शांततेने, घाई न करता) मला जनतेचे वृत्त सांगावे. (मी) सर्वत्र जनतेचे काम करतो. आणि (मी) ज्या कांही तोंडी आज्ञा देतो, दाना संबंधी वा घोषणे संबंधी वा महामात्रांवर सोपविलेल्या कामा संबंधी - जर कांही विवाद उत्पन्न झाला किंवा परिचर्चा होउ लागली तर – त्याची सुचना मला  त्वरित सर्वत्र सर्वकाळी द्यावी. मी अशी आज्ञा करतो. (कितीही) परिश्रमाने किंवा कार्यपूर्तीने मला (संपूर्ण) समाधान होत नाही. सर्व लोकांचे हित हे माझे कर्तव्य आहे. व त्याचे मुळ आहे परिश्रम आणि कार्यपूर्ती. सर्व लोकहिताहून मोठे कांही नाही. मी जो कांही पराक्रम करतो तो, सर्व प्राणिमात्रांच्या(ऋणा)तुन ऋणमुक्त व्हावे, त्यांना येथे सुख द्यावे व पुढे(ही) स्वर्ग प्राप्ति व्हावी, म्हणून. हा नीती-लेख चिरस्थायी व्हावा आणि माझ्या पुत्र, पौत्र व प्रपौत्रांनी लोकहितास्तव त्याचे अनुसरण करावे म्हणून लिहवीला आहे. परम-पराक्रमा विना हे कठीण आहे.
{{अवतरण|देवानाम प्रियदर्शी राजा म्हणतो-गेले काही दिवस कोणतेही व्यवहार झालेले नाहीत किंवा काही अहवालही मला मिळालेले नाहीत. त्यामुळे मी अशी योजना करतो की, मी कोठेही असलो, अगदी जेवत असलो, राणी महालात असलो, अश्वशाळेत असलो, घोड्यावरून रपेट करत असलो किंवा उद्यानात असलो तरी कोणत्याही वेळेस प्रजाजनांचे अहवाल माझ्यापर्यंत आले पाहिजेत. मी कोठेही असलो तरी प्रजाजनांच्या तक्रारींची दखल घेईन. माझ्या देणगीवरून किंवा काही तोंडी हुकुमावरून मंत्रिरीपरिषदेमध्ये काही वाद निर्माण झाल्यास त्याची माहिती कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही ठिकाणी माझ्यापर्यंत आली पाहिजे. सर्वांचे कल्याण करणे माझे कर्तव्य आहे. कष्ट आणि लगोलग कारवाई करण्यातच त्याचे रहस्य आहे. प्रजाजनांचे कल्याण करण्यापेक्षा अन्य कोणतेच काम महत्त्वाचे असत नाही. असे कल्याणकारी कार्य मी करतो. प्रजाजन हे ऐहिक आणि पारमार्थिक जीवनात सुखी रहावेत म्हणूनच ते ॠण फेडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक=द इडिक्ट्स ऑफ किंग अशोका | अ‍ॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी, इ.स. २०१२ | दुवा=http://www.cs.colostate.edu/~malaiya/ashoka.html | भाषा=इंग्रजी}}</ref>}}
 
=== बाराव्या शिलाेखाचा अनुवाद ===
देवांनाप्रिय प्रियदर्शी राजा दानाने व विविध पुजनाने सर्व संप्रदायातील प्रवज्जित (गृहत्यागी) आणि (सद्)गृहस्थांचा सन्मान करतात. परंतु देवांनाप्रिय किर्ती व सारवृद्धीस (जसे) मानतात (तसे) दानास व पुजनास नव्हे. सारवृद्धी अनेक प्रकारे होते. यात मुख्य (म्हणजे) अल्पवाणी (बोलण्यावर संयम). (म्हणजे) काय ? तर विनाकारण स्वसंप्रदायाची पुजा व परसंप्रदायाची निन्दा न करावी वा अल्पशी (चर्चा) त्या त्या प्रकरणी व्हावी. वेळोवेळी परसंप्रदायाची पुजाच व्हावी. असे करणारा स्वसंप्रदायाची वृद्धी व परसंप्रदायास उपकृत करतो. याविपरित करणारा स्वसंप्रदायाची क्षति आणि परसंप्रदायास(ही) अपकार करतो. जो कुणी स्वसंप्रदायाच्या भक्तिस्तव स्वसंप्रदायास (अधिक) प्रकाशित करण्यासाठी स्वसंप्रदायाची पुजा व परसंप्रदायाची निन्दा करतो, तो सत्यतः स्वसंप्रदायाची अधिकाधिक हानी करतो. म्हणून एकत्र  असणे चांगले, एकमेकांचा धर्म (जीवन-तत्वे) ऐकणे व ऐकविणे (चांगले). देवानांप्रिय (राजा) इच्छा करतात की, सर्व संप्रदाय बहुश्रुत (विद्वान) होवोत, कल्याणगामी होवोत. त्या-त्या प्रसन्न (आपपल्या संप्रदायात प्रसन्न) जनांस सांगावे की, देवांनाप्रिय किर्ती व सारवृद्धीस (जसे) मानतात (तसे) दानास व पुजनास नव्हे. याच कारणास्तव अनेक धर्म-महामात्र, स्त्री-प्रधान-महामात्र, वज्रभुमिक आणि अन्य (अधिकारी) नियुक्त केले आहेत. याचाच परिणाम आहे की, स्वसंप्रदायाची वृद्धी आणि धम्माचे प्रकाशन होत आहे.
 
== स्तंभावरील शिलालेख ==
[[चित्र:AshokaLions.jpg|right|thumb|250px|अशोकाचा सारनाथ येथील स्तंभशीर्ष]]