"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५४ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
 
==काव्य==
[[वाग्वैजयंती]] हा गडकरींचा एकमेव [[काव्यसंग्रह]]. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. यात [[मुक्तछंद|मुक्तच्‍छंदापासून]] ते [[छंदबद्ध कविता|छंदबद्ध कवितेपर्यंत]], आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसर्‍या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करण्याची त्यांची पद्धत वाचकाच्या मनात कवितेला अधिक खोलवर नेतेकरीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती ''राजहंस माझा निजला'' ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकर्‍यांनी [[गोविंदाग्रज]] हे टोपण नाव घेतले होते.
 
==विनोदी लेखन==