"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
तिथी हे [[हिंदू धर्म|हिंदू]] कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत [[शुक्ल पक्ष]] होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत [[कृष्ण पक्ष]] होय. अशा या दोन पक्षांच्या एकत्रीकरणाला एक मास म्हणतात.
 
== तिथीचे मापन ==
 
एका विशिष्ठ वेळी [[चंद्र]] आणि [[सूर्य]] एकत्र आले की [[अमावास्या|अमावस्या]] होते.चंद्र व सूर्य एकत्र आल्यानंतर चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे जातो. सूर्य व चंद्र यांच्यात १२ अंशाचे अंतर झाले की प्रतिपदा होते. अशाप्रकारे दर १२ अंशापासून नवीन तिथी चालू होते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तिथी" पासून हुडकले