"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७४:
 
:::खाते विकसक हा फ्लॅग स्वीकृती अधिकाऱ्यास देता येत असेल तर प्रशिक्षण शिबिराच्या आधी कार्यशाळेच्या आयोजकास हा फ्लॅग काही मर्यादित काळासाठी देण्याची पद्धत अमलात आणता येईल. जेणे करून आय पी वरील मर्यादेच्या समस्येचे निराकरण होवूशकेल.ह्या साठी एक विशेष विनंती पान आपण सुरु करून देऊ शकू आणि त्यावर प्रस्तावा सहित विनंती टाकून हा अधिकार मर्यादित स्वरूपात देता येईल.- [[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ००:०९, २ मार्च २०१७ (IST)
 
नमस्कार, मला असं वाटतं विद्यार्थ्यांना एक तर अक्षरांतरण हे शोधता आले नाही त्यामुळे इंग्रजीत सदस्य नावे टाकली गेली. काहीचे म्हणने होतं की आम्ही तर खातीच उघडली नाहीत मग आमच्या नावाची खाती कशी तयार झालेली आहेत. मला वाटतं विद्यार्थ्यांनी यात चुका केल्या असतील. बाकी, एकदा युजरनेम आणि पासवर्ड टाकला की त्याला इमेल पत्त्यावर जाऊन पुन्हा ते खाते सक्रीय करण्यासाठी त्याची पुष्टी करावी लागते, यात काही तांत्रिक बदल करता येईल का ? एकदा युजरनेम पासवर्ड जाग्यावर टाकलं की सदस्य खातं तिथेच सक्रीय होईल आणि सदस्याला तिथेच लिहिता येईल, असं काही. मला माहित आहे, मला तांत्रिक गोष्टीतल्या अडचणी माहिती नसतांना सहज बोलतोय त्या बद्दल क्षमा असावी. दुसरे असे की मराठी कसे उमटते हीच अजूनही विद्यार्थ्यांसाठी आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट होती. मुख्य बारमधे किंवा कुठे स्पष्ट दिसेल असे ''मराठीतून लिहिण्याची सोय'' असं काही बाळबोध वाटणारं वाटलं, तरी लिहिता येईल का असे वाटले. बाकी, सदस्यनामासाठी सहावेळेस प्रयत्न झाला आहे, असे दिसल्यावर मी नवे सदस्यनाम घ्या असे सांगितले. विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनाही लिहायचं खूप आहे. पण लिहायचं कुठं हे अजूनही नेमकेपणाने समजत नाही, यासाठी आपण वर उल्लेख केला तसे काही करता येईल का पाहावे, असे वाटते.
[[सदस्य:प्रा.डॉ.दिलीप बिरुटे|प्रा.डॉ.दिलीप बिरुटे]] ([[सदस्य चर्चा:प्रा.डॉ.दिलीप बिरुटे|चर्चा]]) ४:३५ ७ मार्च २०१७ (IST)
 
{{साद|Rahuldeshmukh101}}
{{साद|माहितगार}}