"नृसिंह सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
वयाच्या आठव्या वर्षी माता-पित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्रीकेदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्णसरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्णसरस्वतींनी नरहरीला मठपरंपरेप्रमाणे संन्यासदीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गांव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले.
 
त्यानंतर गाणगापुरी ते चौवीस वर्षे राहिले. त्या वेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन (दुसरा) याने त्यांची पूजा केली. आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले. त्या ठिकाणी पाताळगंगेत त्यांनी आपला देह विसर्जित केला.
 
नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वानी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.
 
महाराष्ट्रातील दत्तसंप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली.
 
== संदर्भ आणि नोंदी ==