"सरमकुंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यात सरम...
(काही फरक नाही)

००:२६, २८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यात सरमकुंडी हे गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211वर आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

सरमकुंडी गाव पेढ्यांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.खवा व पेढा घेण्यासाठी लोक सरमकुंडी फाट्यावर आवर्जून थांबतात.आसपासच्या गावात खवा तयार होतो. येथून खवा महाराष्ट्रातील विविध शहरात जातो.

सरमकुंडी पासूनच जवळच कुंथलगिरी हे जैन धर्मीयांचे तीर्थस्थळ आहे.या ठिकाणी देशभरातून पर्यटक येतात.

सरमकुंडी गावात दोन शाळा आहेत. जि.प.प्रा.शाळा सरमकुंडी व सरस्वती विद्यालय सरमकुंडी ह्या दोन शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे. या शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले. सरस्वती विद्यालय आठवी ते दहावी पर्यंत आहे. पाऊसपाणी चांगले असते. सिंचनाचे क्षेत्र ही वाढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, सोयाबीन, कापूस यारखी पिके घेतली जातात.

गावात छोटा आठवडी बाजार भरतो. दर रविवारी लोक वाशी येथे ततालुक्याच्या ठिकाणी बाजारासाठी जातात.