"नरेश चंद्र सेनगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
विख्यात '''बंगाली साहित्यिक'''. जन्म बोग्रा येथे. [[कोलकाता]] विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान विषयातील एम्.ए. ही पदवी १९०३ मध्ये प्राप्त केली. नंतर शासकीय शिष्यवृत्ती मिळवून प्रेसिडेन्सी कॉलेजात त्यांनी नवजर्मन व भारतीय तत्त्वज्ञान या विषयांत १९०५ पर्यंत संशोधन केले. कायदा विषयाची पदवी मिळवून त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात वकिलीव्यवसाय सुरू केला आणि त्याच काळात कोलकाता विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात अध्यापनही केले. १९१४ मध्ये त्यांना त्यांच्या '''‘प्राचीन भारतातील समाज व सामाजिक प्रथा’''' या विषयातील संशोधनाबद्दल डीएल्. ही पदवी मिळाली. १९१७ मध्ये त्यांची डाक्का विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली. डाक्का विद्यापीठाच्या विधी विभागात प्राध्यापक म्हणून त्यांनी १९२१–२४ या काळात अध्यापन केले. तसेच विधी विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर अल्पावधीतच ते कोलकाता येथे उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी परतले. १९५० मध्ये [[कोलकाता विद्यापीठ|कोलकाता विद्यापीठा]]त ‘'''टागोर'''’ विधी प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि १९५६ मध्ये भारतीय विधी आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. निष्णात विधिज्ञ असा त्यांचा लौकिक सर्वदूर होता. १९५१ मध्ये यूनेस्कोतर्फे अमेरिकेतील एका चर्चासत्रात भाग घेण्यासाठी कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे इव्होल्यूशन ऑफ लॉ हे पुस्तक एक मान्यताप्राप्त ग्रंथ म्हणून नावाजले गेले आहे.
सेनगुप्त हे काही काळ राजकारणातही सक्रिय होते. बंगालच्या फाळणीच्या विरोधी आंदोलनकाळात (१९०५–१२) ते काँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते होते. नंतरच्या काळात त्यांनी शेतकरी–कामगार पक्षाचे अध्यक्ष (१९२५–२६) व भारतीय मजूर पक्षाचे अध्यक्ष (१९३४) म्हणूनही काम केले.
 
१,४०८

संपादने