"ग्वादालुपे हिदाल्गोचा तह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो Pywikibot v.2
 
ओळ १:
'''ग्वादालुपे हिदाल्गोचा तह''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] आणि [[मेक्सिको]] मध्ये झालेला तह होता. [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १८४८]] रोजी [[व्हिया दे ग्वादालुपे हिदाल्गो]] (आता [[मेक्सिको सिटी]]चा एक भाग) या गावात झालेल्या या तहाने मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेचे सैन्य मेक्सिको सिटीच्या सीमेवर आलेले असताना मेक्सिकोने हा तह करण्याचा प्रस्ताव मांडला.
 
या तहातील कलमांनुसार अमेरिकेने मेक्सिकोला १.५ कोटी [[अमेरिकन डॉलर]] देण्याचे तसेच मेक्सिकोने अमेरिकन नागरिकांना देणे असलेले ३२.५ लाख अमेरिकन डॉलर देण्याचे कबूल केले. बदल्यात मेक्सिकोने अमेरिकेची सीमा [[रियो ग्रांदे नदी]]पर्यंत असल्याचे स्वीकारले तसेच संपूर्ण [[कॅलिफोर्निया]] आणि [[न्यू मेक्सिको]], [[कॉलोराडो]], [[वायोमिंग]], [[अॅरिझोनाॲरिझोना]], [[नेव्हाडा]] आणि [[युटा]]चा भाग अमेरिकेच्या हवाली केला. या प्रदेशांत राहणाऱ्या मेक्सिकोच्या नागरिकांना मेक्सिकोत सुरक्षितपणे स्थलांतरित होण्याचा किंवा अमेरिकेचे नागरिकत्व पत्करण्याचा पर्याय देण्यात आला. ९०%पेक्षा अधिक व्यक्तींनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
 
[[वर्ग:अमेरिकेचा इतिहास]]