"बटाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
नवीन लेख
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ३:
 
[[चित्र:Potato_plant.JPG|thumb|बटाट्याचे झाड]]
==बटाटा लागवडीचे तंत्रज्ञान==
भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पीक मुळचे दक्षिण अमेरिकेतील आहे. भारतामध्ये उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाम या राज्यात बटाट्याची लागवड प्रामुख्याने होते. बटाट्याखालील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र या पाच राज्यातील आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, बीड, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
 
पोषक द्रव्ये व आहारातील महत्त्व : १०० ग्रॅम खाण्यायोग्य बटाट्यामध्ये खालील पोषक द्रव्ये उपलब्ध असतात.
 
==पोषक द्रव्य==
पाणी - ७४.७ ग्रॅम , प्रोटिन्स - १.६ ग्रॅम, सिन्ग्ध पदार्थ - ०.१ ग्रॅम , खनिजे - ०.६ ग्रॅम , तंतूमय पदार्थ - ०.४ ग्रॅम, कर्बोहायड्रेटस -२२.६ ग्रॅम , मॅग्नेशियम -२०० ग्रॅम, कॅल्शिअम -१०.०० ग्रॅम , ऑक्झॉंलिक आम्ल - २०.०० ग्रॅम , निकोटॉंनिक आम्ल - १.२ ग्रॅम , व्हिटॅमेन 'सी' -१७.०० ग्रॅम , फॉस्फरस - ४०.०० मि. ग्रॅम, लोह - ०.७ मि. ग्रॅम, सोडियम -११.०० मि. ग्रॅम पोटॅशियम - २४७.० मि. ग्रॅम, तांबे - ०.२० मि. ग्रॅम, गंधक -३७.० मि. ग्रॅम, क्लोरिन -१६.०० मि. ग्रॅम, रिबोक्लोव्हिन - ०.०१ मि. ग्रॅम, व्हिटॅमेन 'अ' -४०.०० आय. यू. कॅलरिज - ९७.०
 
==महत्त्व==
बटाट्यातील स्टार्चचा उपयोग कपड्यातील डाग घालविण्यासाठी करतात. बटाट्याच्या सालीच्या पाण्यात नवीन साडी भिजविल्यास रंग जात नाही व साडी, कपडे कडक राहतात. बटाट्याच्या फोडी करून चेहऱ्यास लावल्यास त्वचा मऊ राहते.
 
बटाटा हे कंदवर्गीय प्रमुख भाजीपाला पीक असून, आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर केला जातो. बटाट्यामध्ये जीवनसत्त्व 'ब' आणि ' क' भरपूर प्रमाणात असते. तसेच पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तीवर्धक पीक आहे. तसेच हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून योग्य पद्धतीने हाताळल्यास अल्यावधीत अधिक पैसा मिळवून देणारे पीक आहे. तसेच गरिबांनाही बटाटा खाणे परवडते. त्यामुळे बटाट्याची गरज (मागणी) दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु उत्पादन अधिक झाल्यास महारष्ट्रामध्ये शीतगृहाची पुरेशी सोय नसल्यामुळे माल एकाच वेळी बाजारात येऊन भाव पडण्याची शक्यता असते. अशा वेळी सुलभ तंत्रज्ञानाचा उपयोग करून बटाट्याचे महत्त्व तसेच निरनिराळे प्रक्रिया पदार्थ यांचा सखोल अभ्यास करता सुशिक्षित बेरोजगारांच्या सतत भेडसावणाऱ्या समस्येवर मात करता येऊन बटाट्यापासून निरनिराळे प्रक्रिया प्रकल्प उभारून पैसा मिळविता येतो.
 
बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. भारतामध्ये बटाटा लागवडीखालील क्षेत्र १३ लाख हेक्टर असून उत्पादन २३६ लाख टन आहे. देशाच्या मानाने महारष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र फारच कमी १६०० हेक्टर एवढेच असून उत्पादनही कमी आहे.
 
महारष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात लागवड केली जाते. खरीपातील उत्पादनाच्या मानाने रब्बी हंगामातील बटाटा उत्पादन अधिक येते. याचे प्रमुख कारण म्हणजे खरीप हंगामातील लागवड पावसावर अवलंबून असते. बहुतेक वेळा लागवड उशिरा होते. त्यामुळे उगवण कमी होते. अवेळी पडणाऱ्या पावसाने ताण दिल्यास अथवा प्रमाणापेक्षा जास्त पडल्यास पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट येते.
 
रब्बी हंगामात मात्र बटाटा लागवड करून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पिकाची जोमदार वाढ होते. तसेच थंडीमुळे पिकाची वाढ चांगली होते व उत्पादन अधिक येते. पावसाळी बटाट्याच्या तुलनेत रब्बी हंगामातील बटाटा निर्धोक असून त्यापासून अधिक उत्पादन हमखास मिळते.
 
महाराष्ट्र राज्याची सरासरी उत्पादकता एकरी ४० ते५० क्विंटल एवढी कमी आहे. त्यामुळे बटाट्याचे उत्पादन वाढविणे ही काळाची गरज आहे, यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड, योग्य लागवड पद्धत, आधुनिक तंत्रज्ञान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संतुलित वापर केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते. याचे अनुभव खेड तालुक्यामध्ये तसेच सातारा, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतले आहेत.
==लागवडीची पद्धत==
 
बटाटा लागवडीसाठी २ फुटाची सरी पडून त्यामध्ये १५ ते २० सेंमी अंतरावर बटाट्याची लागवड करावी आणि लगेच सारी फोडून घ्यावी. म्हणजे बटाट्याच्या खाप्यावर वरंबा व वरंब्याच्या ठिकाणी सरी तयार होईल. हिवाळ्यातील लागवड ही जमीन ओलावून वाफशावर करावी आणी उगवण झाल्यानंतर पाणी द्यावे.
'''खत व्यवस्थापन'''
बटाटा हे पीक खतास उत्तम प्रतिसाद देते. पालाशयुक्त खते वाढीस पोषक ठरतात. रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा. बटाट्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर लागवडीपुर्वी एकरी १०० किलो आणि लागवडीनंतर पहिली खुरपणी झाल्यावर एकरी ५० किलो द्यावे.
 
'''आंतर मशागत'''
बटाटा पिकास लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी खांदणी करून भर द्यावी. कारण बटाटा उघडा पडल्यास सुर्यप्रकाशाने तो बटाटा हिरवा पडतो. सेलॅनीन या द्रव्यामुळे असा बटाटा खाण्यास निरूपयोगी ठरतो. कारण तो लवकर शिजत नाही आणि तो भाग कडसर लागतो. त्यामुळे अशा बटाट्याला बाजार भाव कमी मिळतो. तसेच मातीची भर लावल्याने जमिनीत हवा खेळती राहिल्याने झाडांची वाढ जलद व चांगली होते. तसेच जमिनीखाली लागलेले लहान - लहान बटाटे पोसण्यास मदत होते.
'''पाणी व्यवस्थापन'''
बटाट्याची एकूण पाण्याची गरज ५० ते ६० सेंमी आहे. खरीपातील बटाट्याला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. तर रब्बी हंगामातील लागवड जमीन ओलावून वाफश्यावर केली असल्यास पहिले पाणी १० ते १५ दिवसांनी द्यावे. रब्बी हंगामामध्ये ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. बटाट्याला एकूण ९ ते १० पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. बटाटे काढणीपूर्वी १० ते १२ दिवस पाणी तोडावे.
 
'''कीड व रोग'''
बटाटा उगवून आल्यानंतर मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी आळी या रसशोषणाच्या किडींचा प्रादुर्भाव होतो.
त्याचबरोबर बटाट्यामध्ये मर, करपा, तांबेरा, बांगडी (Ring Disease) या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
 
 
 
[[वर्ग:कंदमुळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बटाटा" पासून हुडकले