"वड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २२:
 
== सांस्कृतिक/धार्मिक महत्त्व ==
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. [[वटपौर्णिमा]] हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात.
 
चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आडळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणात याच्या उत्पत्तीची कथा आहे. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे ‘वड’ हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात.<ref>http://www.tarunbharat.net/Encyc/2016/6/18/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7.aspx</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/वड" पासून हुडकले