"शंख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो मथळा निर्मिती
ओळ २३:
|-
|}*वास्तुरहस्य :
शंखमाहात्म्य
 
=== शंखमाहात्म्य ===
हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व हिंदू धर्मामध्ये शंखपूजन महत्त्वाचे मानले जाते. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या चार आयुधांमध्ये शंख एक आहे. इतकेच नव्हे तर शंखाची पूजा केल्याखेरीज विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही.
 
=== शंख उत्पत्ती ===
त्वं पुरा सागरोत्पन्न: विष्णुना विधृते करे।
असत: सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते॥
अशी प्रार्थना करून शंखास पूजेमध्ये मानाचे स्थान दिले जाते.
 
[[ब्रह्मवैवर्त पुराण|ब्रह्मवैवर्त]] पुराणात शंखाच्या उत्पत्तीविषयी कथा आहे- शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’ भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.
 
देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी १४ रत्ने बाहेर आली त्यामध्ये एक शंख आहे.
Line ३९ ⟶ ४०:
शंख चंद्रसूर्यासमान देवस्वरूप आहे. त्याच्या मध्यभागी वरुण, पृष्ठभागात ब्रह्मदेव आणि अग्रभागी गंगा व सरस्वतीचे वसतिस्थान आहे. त्रैलोक्यात जेवढी तीर्थे विराजमान आहेत, ती सर्व विष्णूच्या आज्ञेने शंखामध्ये निवास करतात. सूर्याच्या उष्णतेने ज्याप्रमाणे बर्फ वितळून जातो, त्याचप्रमाणे शंखाच्या केवळ दर्शनाने पापे नष्ट होतात, तर त्याच्या स्पर्शाने काय न साध्य होईल ?
 
=== शंखाचे प्रकार ===
शंखाचे मुख्यत: दोन प्रकार असतात. पहिला दक्षिणावर्ती (उजवा) शंख व वामावर्ती (डावा) शंख.
 
Line ५४ ⟶ ५६:
अथर्ववेदामध्ये सात मंत्रांनी युक्त अशा ‘शंखमणिसूक्ता’मध्ये दक्षिणावर्ती शंखाची महती वर्णन केली आहे. दक्षिणावर्ती शंख अंतरीक्ष वायू, ज्योतिमंडल आणि सुवर्णाने युक्त आहे. समुद्रमंथनातून निर्माण झालेला हा शंख राक्षसी, वाईट शक्तींचा नाश करणारा आहे. रोगनिवारण करून आरोग्यसंपन्न आयुर्मान देणारा, जीवनाचे रक्षण करणारा तसेच अज्ञान व अलक्ष्मीस दूर करून ज्ञान व अखंड स्थिर लक्ष्मी देणारा आहे.
 
=== शंख पूजा चे फळ ===
साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणार्‍या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.
 
Line ७९ ⟶ ८२:
 
शास्त्र : शिवपिंडीत शाळुंकेच्या रूपात स्त्रीकारकत्व असल्याने स्त्रीकारकत्व असलेल्या शंखातील पाणी पुन्हा घालण्याची आवश्यकता नसते. बाणलिंगाबरोबर शाळुंका नसल्याने त्याला शंखाच्या पाण्याने स्नान घालतात.
 
=== शंखनाद ===
 
आरतीच्या वेळी शंखनाद विहित असणे :
"https://mr.wikipedia.org/wiki/शंख" पासून हुडकले