"पुरुषोत्तम पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''प्रा. पुरुषोत्तम पाटील''' ([[जन्म]] : बहादरपूर - जळगाव जिल्हा, ३ मार्च, [[इ.स. १९२८]]; मृत्यू : धुळे, १६ जानेवारी, इ.स. २०१७) हे एक [[मराठी]] [[कवी]] आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते. ते मूळचे [[अमळनेर]] तालुक्यातील ढेकू या गावचे. त्यांचे बडीलवडील प्राथमिक शिक्षक होते. पुरुषोत्तम पाटलांचे सातवीपर्यंतचे शिक्षण बहादरपूर या गावी, आणि नंतरचे अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधे झाले. याच काळात त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. पुढे कॉलेज शिक्श्षणासाठीशिक्षणासाठी पुण्यात आल्यावर तेथील समृद्ध वाङ्‌मयीन संस्कृतीमुळे त्यांच्या काव्यलेखनाला अनुकूल वातावरण लाभले.
 
कवयित्री [[सरिता पदकी]] या महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम पाटील त्यांचे सहाध्यायी होते. [[सरिता पदकी|सरिताबाईंच्या]] कविता पुरुषोत्तम पाटील यांनी स्वहस्ते उतरवून काढून, ’साहित्य’, ’अभिरुची’ आणि ’सत्यकथा’ या तीन प्रतिष्ठित नियतकालिकांकडे पाठवल्या होत्या. त्या तिन्हीकडेही प्रसिद्ध झाल्या, आणि [[सरिता पदकी]] यांना साहित्यवर्तुळात थोडे स्थान मिळाले. मात्र त्या वेळेपर्यंत पाटलांनी आपल्या कविता प्रसिद्धीला दिल्या नव्हत्या.