"गणेश हरी खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखाचे प्रास्ताविक
 
आयुष्यक्रम व कार्य
ओळ १:
'''गणेश हरी खरे''' ‍‌‍‍‍‍‍‍‍‍([[जन्म]] [[जानेवारी १०|१० जानेवारी]] [[इ.स. १९०१|१९०१]] - [[मृत्यू]] [[जून ५|०५ जून]] [[इ.स. १९८५|१९८५]])<ref name=":0">मेहेंदळे, गजानन भास्कर; '''संशोधकांचे मित्र'''; समाविष्ट : खरे, गणेश हरी; संशोधकाचा मित्र; पुनर्मुद्रण २०१०; भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे; पृ. एक-दहा. </ref> हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 
== आयुष्यक्रम व कार्य ==
ग. ह. खरे ह्यांचा जन्म पनवेल इथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. १९२० साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
 
=== असहकारितेच्या चळवळीतील सहभाग ===
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी ह्यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ह्यासाठी खरे ह्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांचे सहकारी वि. ना. आपटे ह्यांच्यासह खरे ह्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि असहकारितेच्या तत्त्वाप्रमाणे जामीन द्यायचे नाकारल्याने त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदीवासाची शिक्षा देण्यात आली.<ref name=":0" />
 
बंदीवासातून ११ ऑगस्ट २०२३ रोजी सुटका झाल्यावर खरे ह्यांनी सातारा जिल्ह्या कॉंग्रेसचे एक चिटणीस म्हणून वर्षभर काम केले. १९२४च्या उत्तरार्धापासून १९२९च्या प्रारंभापर्यंत साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली.<ref name=":0" />
 
ह्या काळात खरे ह्यांनी इतिहाससंशोधनासाठी आवश्यक पूर्वतयारी केली. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. तसेच त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू ह्या लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केल्या. त्या लिप्यांतील साहित्य त्यांना वाचता येऊ लागले.
 
=== भारत-इतिहास-संशोधक मंडळातील काम ===
साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेतील नोकरी सोडल्यावर खरे पुणे येथे आले. भारत-इतिहास-संशोधक मंडळाच्या शिवचरित्र-कार्यालयात मोडी कागदपत्रांच्या लिप्यंतराचे काम त्यांनी काही काळ केेले. ६ महिन्यांनतर त्यांची नेमणूक शिवचरित्र-कार्यालयात करण्यात आली. १९३० साली त्यांची नेमणूक भारत-इतिहास-संशोधक मंडळात करण्यात आली.
 
भारत-इतिहास-संशोधक मंडळात काम करत असताना खरे ह्यांनी स्वतःच पुस्तकांच्या व फार्सी जाणकारांच्या साहाय्याने फार्सी भाषा व लिपी आत्मसात केली. तसेच कानडी भाषा व लिपी ह्यांचाही अभ्यास केला. जुनी कानडी भाषाही (हळे कन्नड) त्यांना कळू लागली.
 
खरे ह्यांनी शिवचरित्रसाहित्य खंड ६ (१९३७), खंड ११ (१९५८), खंड १२ (१९६४), खंड १३ (१९६५) ह्यांचे संपादन केले. तसेच त्यांनी ऐतिहासिक फार्सी साहित्याचे ६ खंड संपादित केले. तसेच त्यांचे इतिहाससंशोधनपर लेखन विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले. खरे ह्यांनी विविध ठिकाणी भ्रमंती करून कागदपत्रे व इतर ऐतिहासिक वस्तू ह्यांचा संग्रह करून तो भारत-इतिहास-संशोधक मंडळाला मिळवून दिला. ह्यात सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख ह्यांचा समावेश आहे.<ref name=":0" /> त्यांनी ५०हून अधिक पुस्तके आणि इंग्लश व मराठी ह्या भाषांत मिळून सुमारे ३५० लेख लिहिले आहेत.<ref name=":0" />
 
== मानसन्मान<ref name=":0" /> ==
* इंडियन हिस्टॉरिक कमिशनवर भारत-इतिहास-संशोधक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ३० वर्षे सहभाग
* इंडियन हिस्टरी कॉंग्रेसच्या १९५१च्या अधिवेशनात मध्ययुगीन शाखेचे अध्यक्षपद
* पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाद्वारे डॉक्टरेट पदवीसाठीचे मार्गदर्शक व परीक्षक
* न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेच्या १९७४च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद
* पुणे विद्यापीठाद्वारे १९८४ साली सन्माननीय डी लिट् पदवी
* जानेवारी १९८५च्या धारवाड येथील पुराभिलेख परिषदेत सत्कार
 
== ग्रंथसंपदा ==
 
== संदर्भ ==
<references />
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:इतिहास संशोधक]]