"गोविंद शंकर कुरूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३९:
 
==पुस्तके==
वयाच्या नवव्या वर्षी गोविंद शंकर कुरूप यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली आणि १९२३ ते २९ मध्ये ‘साहित्यकौतुकम्’चे चार खंड प्रकाशित झाले. एकूण २५ काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ‘सूर्यक्रान्ति’, ‘निमिषम्’, ‘अन्तर्दाहं’, ‘विश्वदर्शनम्’, ‘पाथेयम्’ इ. त्यांच्या निवडक कवितांचे संग्रह आहेत. १९७२ मध्ये ते प्रकाशित झाले. त्यांचे ‘मधुरम् सौम्यम् दीप्तम्’, ‘वेळिच्चतिष्टे दूतम्’ आणि ‘सान्ध्यरागम्’ हे तीन काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय आहेत.
* '''कविता संग्रह''' - साहित्य कौतुकम् - चार खंड (१९२३-१९२९), सूर्यकांति (१९३२), नवातिथि (१९३५), पूजा पुष्पमा (१९४४), निमिषम् (१९४५), चेंकतिरुकल् मुत्तुकल् (१९४५), वनगायकन् (१९४७), इतलुकल् (१९४८), ओटक्कुणल (१९५०), पथिकंटे पाट्टु (१९५१), अंतर्दाह (१९५५), वेल्लिल्प्परवकल् (१९५५), विश्वदर्शनम् (१९६०), जीवन संगीतम् (१९६४), मून्नरुवियुम् ओरु पुष़युम् (१९६४), पाथेयम् (१९६१), जीयुहे तेरंजेटुत्त कवितकल् (१९७२), मधुरम् सौम्यम् दीप्तम्, वेलिच्चत्तिंटे दूतम्, सान्ध्यरागम्.
 
काव्य, निबंधसंग्रह, नाटक, बालसाहित्य, आत्मकथा आणि अनुवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ‘सान्ध्य’, ‘ऑगस्ट १५’ इ. तीन नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘ओम्र्मयुटे ओलंगलिल’ हे दोन खंडांतील त्यांचे आत्मकथन १९७८ मध्ये प्रसिद्ध झाले. १९४८ मध्ये त्यांनी ‘निर्मला’ या चित्रपटासाठी गीतलेखनही केले आहे.
 
बंगाली, संस्कृत, फ्रेंच, फारसी इ. भाषांतील काही साहित्याचे अनुवादही त्यांनी केले आहेत. तसेच कुरूपजींच्या रचनांचे हिन्दी, इंग्रजी इ. अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. धारवाड येथील प्रसिद्ध हिंदी भाषाप्रेमी मट्टतिरिजी यांनी कुरूपजींच्या अनेक कवितांचे हिंदी पद्यानुवाद केले आहेत.
 
केरळ साहित्य परिषदेच्या ‘परिषद’ या मुखपत्राचे ते संपादक होते. मल्याळी साहित्य परिषदेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते, तसेच १९६८-७२ या काळात राज्यसभा सदस्य होते
 
==कुरूप यांचे काही कविता संग्रह==
* '''कविता संग्रह''' - साहित्य कौतुकम् - चार खंड (१९२३-१९२९), सूर्यकांति (१९३२), नवातिथि (१९३५), पूजा पुष्पमा (१९४४), निमिषम् (१९४५), चेंकतिरुकल् मुत्तुकल् (१९४५), वनगायकन् (१९४७), इतलुकल् (१९४८), ओटक्कुणल (१९५०), पथिकंटे पाट्टु (१९५१), अंतर्दाह (१९५५), वेल्लिल्प्परवकल् (१९५५), विश्वदर्शनम् (१९६०), जीवन संगीतम् (१९६४), मून्नरुवियुम् ओरु पुष़युम् (१९६४), पाथेयम् (१९६१), जीयुहे तेरंजेटुत्त कवितकल् (१९७२), मधुरम् सौम्यम् दीप्तम्, वेलिच्चत्तिंटे दूतम्, सान्ध्यरागम्, वगैरे.
 
==[[पुरस्कार]]==