"विकिपीडिया:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
* उल्लेखनीय विषयाचा अंगभूत गूणधर्म असणे
* इतर विश्वासार्ह माहिती/ज्ञान स्रोतांनी दखल घेतलेली असणे
 
 
==उल्लेखनीयता मर्यादा==
===व्यक्ति विषयक लेख===
*मराठी विकिपीडियावर एखादा लेख टिकुन राहण्यासाठी ज्ञानकोश म्हणून उल्लेखनीयतेचे निकष महत्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्ती बद्दल काही विशेषत्व दाखवल्या शिवाय ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही. हनुमाना सारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पुजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जिर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणार्‍या भक्तगणांची संख्य अगणीत असते काही जणांची एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशिय मजकुर उपलब्ध होणार असतो. हनुमानाकरीता स्वतंत्र लेख बनवणे समजण्या सारखे आहे. हनुमानाच्या मंदीरांची शृंखला बांधवून घेणार्‍या समर्थ रामदास इत्यादी भक्तगणाकरिता स्वतंत्र लेख होऊ शकतील एवढा मजकुर असतो. पण अशा देवतांच्या पायरीवर नाव कोरुन घेणार्‍या व्यक्तींची भक्तीही विशेष असू शकेल परंतु १) इतर चारचौघांपेक्षा काही वेगळी नोंद होणे २) सहसा इतर माध्यमातून त्याची दखल घेतलेली असून तसा संदर्भ उपलब्ध असणे या निकषांना सर्वच भक्त पार करून ज्ञानकोशात स्थान मिळवू शकतील असे नाही.
 
काही वेळा काही व्यक्ती विशेषही असू शकतात की ज्याची ज्ञानकोशीय लेखक संपादकांना कल्पना असेलच असे नाही. पण अशी उल्लेखनीयता सिद्ध करण्याचा जिम्मा सर्वसाधारणपणे असे लेख तयार करणार्‍या व्यक्तीवरच सोडून अनुल्लेखनीय वाटणारे लेख सहसा वगळले जातात. श्री. भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांच्या बद्दल असाच एक लेख मराठी विकिपीडियावर आला इतर राजकारणी मंडळींपेक्षा काही विशेष उल्लेखनीयतेची नोंद उपलब्ध झाली तर कदाचित पुन्हाही मराठी विकिपीडियावर येऊ शकेल परंतु सद्य खाली दिलेल्या माहितीच्या आधारावरतरी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही आहे म्हणून सदर लेख मराठी विकिपीडियातून वगळून त्यांचे बद्दल मराठी विकिपीडियावर प्रकाशित माहिती [http://www.misalpav.com/node/34202 इतर मराठी संकेतस्थळावर येथे स्थानांतरीत] करीत आहे.
 
 
* केवळ काही जर्नल्स आणि लेख लिहिणे हे ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेस पुरेसे होईलच असे नाही. त्या साठी त्यांच्या उल्लेखनीय कार्यांची माहिती वगैरे द्यावई लागेल या बाबत घाई करण्या पेक्षा व्यक्ती विषयक लेखाचा खूप आग्रह न धरता त्यांनी ज्या विषयांवर लेखन केले आहे त्याच विषयावर मराठी विकिपीडियातील लेखात त्यांच्या लेखनातील मते उधृत करता येतील आणि त्यांच्या लेखनाचा नावाचा संदर्भ नमुद करता येईल. (अर्थात त्यांची मते नमुद करतानाही ती तुम्हाला तुमच्या शब्दात नमुद करावी लागतील अन्यथा कॉपीराईटचा प्रश्न उपस्थित होतो हे वेगळे सांगणे न लगे.)
* संदर्भ स्रोतासाठी म्हणून उल्लेखनीय ठरलेली व्यक्ती ज्ञानकोशावर स्वतंत्र नोंद असावी एवढी उल्लेखनीय असेलच असे नाही. काही उल्लेखनीयता अथवा संदर्भमूल्य असलेले माहिती/ज्ञान सर्वसामान्य व्यक्तीकडेही असू शकते तेवढ्या विशीष्ट संदर्भात नमुद करण्या पलिकडे त्या व्यक्तीस स्वतंत्र ज्ञानकोशीय उल्लेख असणे अत्यावश्यक नसावे. त्या पलिकडे जाऊन त्यांची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे का आणि तशी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असल्यास स्वतंत्र लेख लिहिण्या इतपत स्वतंत्र मजकुर उपलब्ध आहे का, आणि मजकुर उपलब्ध असूनही लेख ज्ञानकोशात उपलब्ध आहे का या स्वतंत्र बाबी असतात.