"त्र्यंबक शंकर शेजवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''त्र्यंबक शंकर शेजवलकर''' (२५ मे [[इ.स. १८९५|१८९५]] - २८ नोव्हेंबर [[इ.स. १९६३|१९६३]]) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक, संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''', '''श्रीशिवछत्रपती''' इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन '''प्रगती''' ह्या त्यांनीच संपादित केलेल्या साप्ताहिकातून प्रकाशित झाले आहेत.
==चरित्र==
[[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्याच्या]] [[राजापूर तालुका|राजापूर तालुक्यातील]] कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे [[मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़]] संस्थापकांपैकी एक होते.<ref>शेजवलकर, त्र्यंबक शंकर; '''माझे वडील'''; तरुण भारत : दीपावली विशेषांक; १९६५; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. १३) </ref> [[मुंबई]]च्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते इ.स. १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. एम. ए. ह्या पदवीसीठी त्यांनी '''मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव''' ह्या विषयावरील प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता पण परीक्षकांशी मतभेद झाल्याने त्यांना तो मान्य झाला नाही आणि त्यामुळे शेजवलकरांना एम. ए. ही पदवी मिळाली नाही.<ref पुढेname=":0">खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ७८)</ref> मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली. मुंबईच्या कर्नाटक छापखान्याने त्यांच्या संपादकत्वाखाली ८ जून १९२९ रोजी प्रगती हे साप्ताहिक सुरू केले.<ref name=":0" /> ते त्यावेळेच्या ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे १९३२ साली बंद पडले.
 
== संदर्भ ==