"त्र्यंबक शंकर शेजवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रास्ताविकात भर
चरित्रात्मक माहिती
ओळ १:
'''त्र्यंबक शंकर शेजवलकर''' (२५ मे [[इ.स. १८९५|१८९५]] - २८ नोव्हेंबर [[इ.स. १९६३|१९६३]]) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक, संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''', '''श्रीशिवछत्रपती''' इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन '''प्रगती''' ह्या त्यांनीच संपादित केलेल्या साप्ताहिकातून प्रकाशित झाले आहेत.
==चरित्र==
 
[[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्याच्या]] [[राजापूर तालुका|राजापूर तालुक्यातील]] कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे [[मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़]] संस्थापकांपैकी एक होते. [[मुंबई]]च्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते इ.स. १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. पुढे मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली.
 
{{मराठी साहित्यिक}}