"विज्ञानकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
छोNo edit summary
ओळ ७:
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी विज्ञान कथा , कादंबऱ्या लिहिण्याचं काम थंडावलं. पण, स्वातंत्र्योत्तर काळात १९५० नंतर अनुवादित विज्ञान कथा , कादंबऱ्या लेखनाने पुन्हा सुरु झालं.  भा. रा. भागवत यांनी ज्यूल्स व्हर्न आणि एच. जी. वेल्स यांच्या अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज , ट्वेन्टी थाऊजंड लिग अंडर द सी , इनव्हिजिबल मॅन या कथांना इथल्या मातीचा स्पर्श करून लिहिल्या. त्या कथा बालमित्रमध्ये छापून येत होत्या. त्यामुळे, त्या कथा जरी लहान थोर सगळ्यांना आवडल्या तरी विज्ञानकथेवर मात्र बालसाहित्य , साहसकथा असा शिक्का बसला. आणि त्यामुळे त्या कथांना जरी यश आलं तरी विज्ञानकथांच्या प्रगतीत त्यामुळेच मोठा अडसर निर्माण झाला. त्याचा परिणाम यशवंत रांजणकर , नारायण धारप, द. पां. खांबेटे, दि. बा. मोकाशी यांच्या लेखनावर झाला. त्यातील बरंच लेखन हे अनुवादित वा रूपांतरित होतं. पण, दि. बा. मोकाशी यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा मात्र स्वतंत्र होत्या. 
 
भा. रा. भागवत यांचा ' एक उडती छबकडी ' हा सगळ्यात पहिला विज्ञान कथासंग्रह १९६६ साली आला. त्याच्याशी स्पर्धात्या करतपाठोपाठ द.पां. खांबेटे यांचा ' माझे नाव रमाकांत वालावलकर' हा विज्ञान कथासंग्रह आला.  द.पां. खांबेटे यांच्या यातील सगळ्या कथा रहस्यरंजनमध्ये प्रकाशित झालेल्या होत्या. 
 
आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान तंत्रज्ञानाला जसजसं महत्व यायला लागलं तास त्याचा प्रसारही वेगाने व्हायला लागला. विज्ञान जीवनाला सर्व अंगांनी भिडायला लागलं. आणि त्यानंतर आधुनिक विज्ञानकथांचा उदयकाल १९७५ पासून झाला असं मानलं जातं. 
 
जयंत नारळीकर यांच्या कृष्णविवर या कथेपासून विज्ञानकथेकडे गंभीरपणे पाहिलं जायला लागलं. अर्थात,  जयंत नारळीकर यांच्याआधीही  निरंजन घाटे विज्ञान कथा लेखन करत होतेच.  निरंजन घाटे १९७१ पासून विज्ञान कथास्पर्धेत बक्षीस मिळवणारे विज्ञान साहित्य लेखक आहेत. १९७५ च्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांची आणि ते करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आणि त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तेव्हापासून विज्ञानकथा या प्रकाराला समीक्षकांनी गंभीरपणे घेतलं. आणि मग तिची दिवसेंदिवस प्रगती होतच राहिली. त्याच काळात ललित कथांशी जवळीक साधून ललित कथांच्या निकषाला अनुसरून विज्ञान कथा  लिहायला सुरुवात केली ती विज्ञान कथा लेखक  बाळ फोंडके यांनी.  विज्ञानकथा लेखन या प्रकारात बाळ फोंडके यांचं योगदान फार महत्वपूर्ण आहे.विज्ञानातल्या नव्या शोधांमुळे मानवी नातेसंबंधांचा जो विचित्र गुंता होतो याचं चित्रण त्यांच्या विज्ञानकथांमधून दिसून येतं. लक्ष्मण लोंढे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय  विज्ञान कथाकारांची यादी अपूर्णच राहील. त्यानंतर या विज्ञान साहित्यिकात काहीसे तरुणविज्ञानकथा असणारेलेखकात श्री. सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या विज्ञानकथांची शैली विशेष उल्लेखनीय अशी आहे.  त्यांच्या कथेतील काल्पनिकता श्वास रोखून ठेवणारी आणि कथाही उल्लेखनीय अशा आहेत. 
 
याव्यतिरिक्त अरुण साधू ,  अरुण हेबळेकर यांच्या विज्ञानकथातून त्यांनी माणसांचा वेध घेतला गेलेला आहे. प्रा. माधुरी शानबाग यांच्या विज्ञानकथा लेखनात तंत्रज्ञानाच्या झपाट्यात माणूसपणाच्या खुणा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. तर अरुण मांडे यांच्या विज्ञानकथेत विशेष शैली दिसून येते.