"विज्ञानकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १:
विज्ञानकथा हा वाङ्मय प्रकार आहे ; जो ललितकथेच्याच निकषाला अनुसरून गुंफला जातो. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो ? त्या काळातील समाज कसा असेल , मानवी परस्परसंबंध कसे असतील याच चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञानकथा ! विज्ञानकथा ही माणसांची कथा असते. 
विज्ञान कथा हा लिखित [[साहित्य|साहित्यातील]] एक प्रकार आहे. विज्ञानकथा लेखक [[आयझॅक आसिमॉव्ह]], आर्थर सी.क्लार्क, रॉबर्ट हाइनलाइन, ब्रायन आल्डिस आणि इतरही अनेक लेखक ‘अस्टाउंडिंग सायन्स फिक्शन’, ‘वंडर स्टोरीज्’सारख्या मासिकांमधून लिहीत होते. या लेखकांनी हा कथा प्रकार चांगल्यापैकी हाताळला. मराठी अनुवादित विज्ञानकथा इ.स. १९०० पासून लिहिल्या जात आहेत. असे असले तरी खर्‍या अर्थानं इ.स. १९१६ साली पहिली स्वतंत्र मराठी विज्ञानकथा प्रकाशित झाली.
 
विज्ञानसाहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झाला. इंग्रजीतली पहिली विज्ञानकथा फ्रँकेस्टाईन ही १८१८ साली मेरी शेली या लेखिकेने लिहिली. इंग्रजी साहित्यात निर्माण झालेला विज्ञानसाहित्याचा प्रवाह मराठी भाषेतही रूढ व्हायला सुरुवात झाली.  
==केरळ कोकीळमध्ये पहिली विज्ञान कथा==
‘केरळ कोकीळ’च्या जून १९०० च्या अंकात ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून ॲन्ड बॅक’च्या क्रमश: अनुवादाला सुरुवात झाली. अनुवादकाला जमेल तसा हा अनुवाद १९०६ पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता. पण त्यावर अनुवाद करणार्‍याचे नाव नसे. म्हणजे त्याकाळच्या प्रथेप्रमाणे तो अनुवाद ‘केरळ कोकीळ’चे संपादक चित्रमयूर कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केला असावा असे गृहीत धरता येते.
 
त्याची सुरुवात सर्वप्रथम १९०० मध्ये कृष्णाजी आठले यांच्या ज्यूल्स व्हर्नच्या कादंबरीच्या 'चंद्रलोकची सफर' या नावाने केलेल्या  अनुवादाने झाली.   त्याचं  प्रकाशन 'केरळकोकिळ' या मराठी नियतकालिकात झालं.  ते काम सहा वर्ष चालू होतं. त्यानंतर  १९११ साली श्रीधर रानडे यांनी लिहिलेली ' तारेचे हास्य' या त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथेने विज्ञानकथा लेखनाची खरी पायाभरणी झाली. वा. म. जोशी यांनी लिहिलेल्या दोन कथा 'अप्रकाशित किरणांचा दिव्य प्रकाश ' आणि ' वामलोचना' १९१४ साली प्रकाशित झाल्या. 
==श्री.बा. रानडे यांची ‘तारेचे हास्य’ आणि ’रेडियम’==
श्री.बा. रानडे यांची ‘तारेचे हास्य’ ही विज्ञानकथा त्या वर्षी ‘मासिक मनोरंजन’च्या अंकात १९१६ साली मार्च महिन्यात प्रसिद्ध झाली. १९१६ सालीच श्री. बा. रानडे यांनी ‘उद्यान’ या मासिकात ‘रेडियम’ ही कथा लिहिली.
 
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी विज्ञान कथा , कादंबऱ्या लिहिण्याचं काम थंडावलं. पण, स्वातंत्र्योत्तर काळात १९५० नंतर अनुवादित विज्ञान कथा , कादंबऱ्या लेखनाने पुन्हा सुरु झालं.  भा. रा. भागवत यांनी ज्यूल्स व्हर्न आणि एच. जी. वेल्स यांच्या अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज , ट्वेन्टी थाऊजंड लिग अंडर द सी , इनव्हिजिबल मॅन या कथांना इथल्या मातीचा स्पर्श करून लिहिल्या. त्या कथा बालमित्रमध्ये छापून येत होत्या. त्यामुळे, त्या कथा जरी लहान थोर सगळ्यांना आवडल्या तरी विज्ञानकथेवर मात्र बालसाहित्य , साहसकथा असा शिक्का बसला. आणि त्यामुळे त्या कथांना जरी यश आलं तरी विज्ञानकथांच्या प्रगतीत त्यामुळेच मोठा अडसर निर्माण झाला. त्याचा परिणाम यशवंत रांजणकर , नारायण धारप, द. पां. खांबेटे, दि. बा. मोकाशी यांच्या लेखनावर झाला. त्यातील बरंच लेखन हे अनुवादित वा रूपांतरित होतं. पण, दि. बा. मोकाशी यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा मात्र स्वतंत्र होत्या. 
==क्ष किरण आणि स्त्रीचा डावा डोळा==
१९१६साली क्ष किरणाचा वापर सुरू झाला होता. स्त्रियांना डाव्या डोळाने कमी दिसते अशीही एक गैरसमजूत त्या काळी होती. या दोन्ही गोष्टींवर आधारित ‘अदृश्य किरणांचा दिव्य प्रताप’ आणि ‘वामलोचना’ नावाच्या ’विज्ञानकथा’ [[वामन मल्हार जोशी]]यांनी लिहिल्या आणि ‘नवपुष्प करंडक’ या संग्रहात प्रकाशित केल्या.
 
भा. रा. भागवत यांचा ' एक उडती छबकडी ' हा सगळ्यात पहिला विज्ञान कथासंग्रह आला. त्याच्याशी स्पर्धा करत द.पां. खांबेटे यांचा ' माझे नाव रमाकांत वालावलकर' हा विज्ञान कथासंग्रह आला.  द.पां. खांबेटे यांच्या यातील सगळ्या कथा रहस्यरंजनमध्ये प्रकाशित झालेल्या होत्या. 
==पुढच्या काळात प्रसिद्ध झालेल्या मराठी विज्ञानकथा==
* त्र्यं.र. देवगिरीकरांची ’२०१८’ : ’चित्रमयजगता’त १९२३मध्ये प्रकाशित.
* त्र्यं.र. देवगिरीकरांची ’शरद लोकाची सफर’ : ’चित्रमयजगता’त १९३६मध्ये प्रकाशित.
* [[वि.वा. शिरवाडकर]]ांची कल्पनेच्या तीरावर
* [[ना.के. बेहेरे]] यांची ध्येयाकडे
 
आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान तंत्रज्ञानाला जसजसं महत्व यायला लागलं तास त्याचा प्रसारही वेगाने व्हायला लागला. विज्ञान जीवनाला सर्व अंगांनी भिडायला लागलं. आणि त्यानंतर आधुनिक विज्ञानकथांचा उदयकाल १९७५ पासून झाला असं मानलं जातं. 
==वैज्ञानिक असत्यांवर आधारलेल्या विज्ञानकथा==
एखादी गोष्ट विशिष्ट काळात वैज्ञानिक सत्य मानली जाते. पुढे अधिक संशोधनानंतर ती सत्य मानली गेलेली विज्ञानकल्पना ही ‘कल्पना’च होती, किंवा ती चुकीची होती, हे सिद्ध होते.. पण जेवढा काळ ती कल्पना सत्य मानली जात होती तोपर्यंत त्या कल्पनेवर आधारित साहित्य हे विज्ञान साहित्यच असते.
 
जयंत नारळीकर यांच्या कृष्णविवर या कथेपासून विज्ञानकथेकडे गंभीरपणे पाहिलं जायला लागलं. अर्थात,  जयंत नारळीकर यांच्याआधीही  निरंजन घाटे विज्ञान कथा लेखन करत होतेच.  निरंजन घाटे १९७१ पासून विज्ञान कथास्पर्धेत बक्षीस मिळवणारे विज्ञान साहित्य लेखक आहेत. १९७५ च्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांची आणि ते करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आणि त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तेव्हापासून विज्ञानकथा या प्रकाराला समीक्षकांनी गंभीरपणे घेतलं. आणि मग तिची दिवसेंदिवस प्रगती होतच राहिली. त्याच काळात ललित कथांशी जवळीक साधून ललित कथांच्या निकषाला अनुसरून विज्ञान कथा  लिहायला सुरुवात केली ती विज्ञान कथा लेखक  बाळ फोंडके यांनी.  विज्ञानकथा लेखन या प्रकारात बाळ फोंडके यांचं योगदान फार महत्वपूर्ण आहे.विज्ञानातल्या नव्या शोधांमुळे मानवी नातेसंबंधांचा जो विचित्र गुंता होतो याचं चित्रण त्यांच्या विज्ञानकथांमधून दिसून येतं. लक्ष्मण लोंढे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय  विज्ञान कथाकारांची यादी अपूर्णच राहील. त्यानंतर या विज्ञान साहित्यिकात काहीसे तरुण असणारे  सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या विज्ञानकथांची शैली विशेष उल्लेखनीय अशी आहे.  त्यांच्या कथेतील काल्पनिकता श्वास रोखून ठेवणारी आणि कथाही उल्लेखनीय अशा आहेत. 
याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे १८१८ साली लिहिलेली मेरी शेलीची ‘फ्रँकेन्स्टाइन ऑर द मॉडर्न प्रॉमेथिअस’ ही कादंबरी होय. या कादंबरीपासून इंग्रजी विज्ञान साहित्याची सुरुवात झाली असे मानले जाते.
 
याव्यतिरिक्त अरुण साधू ,  अरुण हेबळेकर यांच्या विज्ञानकथातून त्यांनी माणसांचा वेध घेतला गेलेला आहे. प्रा. माधुरी शानबाग यांच्या विज्ञानकथा लेखनात तंत्रज्ञानाच्या झपाट्यात माणूसपणाच्या खुणा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. तर अरुण मांडे यांच्या विज्ञानकथेत विशेष शैली दिसून येते. 
त्या काळात स्थिर विद्युतनिर्मिती तसेच विद्युतघट निर्मितीचे अलेक्झांड्रो व्होल्टा यांचे प्रयोग गाजत होते. विजेच्या तारेचा स्पर्श होताच मेलेला बेडूक पाय हलवतो- ही बातमी तेव्हा गाजत होती. त्यामुळे विजेच्या साहाय्याने मृत जीवाला संजीवनी मिळाल्याप्रमाणे पुनरुज्जीवित करता येते हीच कल्पना मेरीने तिच्या कथेत वापरली. कादंबरी १८१८मध्ये[रकाशित झाली, पण तिच्यावर मेरीचे नाव नव्हते. ‘स्त्रिया साहित्यनिर्मिती करू शकत नाहीत. जरी त्यांनी ती केली, तरी ती काळाच्या कसोटीवर टिकू शकत नाही,’ मेरीचे नाव टाकले असतेते कादंबरी खपली नसती असे प्रकाशकाला वाटले.
 
इतर साहित्याच्या तुलनेत विज्ञान साहित्याकडे जास्त मूलभूत पातळीवर जीवनदर्शन घडवण्याची क्षमता असते. मराठी विज्ञानकथेने गेल्या पन्नास साठ वर्षात गाठलेला पल्ला प्रशंसनीय आहे. आणि आता पुढे तशीच वाटचाल कायम चालू राहील असं आशादायी लिखाण होत आहे. 
१८३१ मध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती निघाली. पुढची अनेक वर्षे या कादंबरीच्या सटीक आणि विशेष भाष्यासह, मानसिक पृथक्करणासह अशा विविध प्रकारच्या आवृत्त्या बाजारात आल्या, आणि येत आहेत. मेरी शेलीने सत्य ’मानलेले विजेचे झटके देऊन मृत जीव सजीव करता येतो’, हे गृहीतक खोटे ठरले, तरीही तिच्या या कादंबरीला अजूनही विज्ञान साहित्याचाच दर्जा देण्यात येतो.
 
==काही प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक==
 
=== स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी विज्ञान कथा लेखक ===
* भा. रा. भागवत 
* द. पां. खांबेटे 
* नारायण धारप 
* गजानन क्षीरसागर 
* दि. बा. मोकाशी 
* यशवंत रांजणकर 
 
==काही प्रसिद्ध<big><u>आधुनिक विज्ञान कथा लेखक==</u></big> 
 
===मराठी विज्ञान कथा लेखक===
जयंत नारळीकर 
* प्रा. [[मोहन आपटे]]
 
* [[निरंजन घाटे]]
बाळ फोंडके
* [[ग.रा.टिकेकेर]]
 
* [[मधुकर विश्वनाथ दिवेकर]]
निरंजन घाटे 
* [[नारायण धारप]]
 
* प्रा. [[जयंत नारळीकर]]
लक्ष्मण लोंढे 
* डॉ. [[बाळ फोंडके]]
 
* [[भा.रा. भागवत]]
सुबोध जावडेकर 
* [[यशवंत रांजणकर]]
 
* [[द.चिं. सोमण]]
यशवंत रांजणकर 
 
अरुण साधू 
 
अरुण हेबळेकर 
 
माधुरी शानबाग 
 
शुभदा गोगटे 
 
......... 
 
विज्ञान कथांच्या प्रगतीमुळे पुढे यादी वाढत चालली आहे.<big><u><br>
</u></big>
==काही प्रसिद्ध विज्ञान कथा==
==मराठी विज्ञान कथा==
* दुसरा आइन्स्टाईन (लेखक - [[बाळ फोंडके]])
* प्रेषित (लेखक - [[जयंत नारळीकर]])
* मंगळावर स्वारी (लेखक - [[भा.रा, भागवत]])
* यक्षांची देणगी (लेखक - [[जयंत नारळीकर]])
* वामन परत न आला (लेखक - [[जयंत नारळीकर]])
* व्हायरस (लेखक - [[लेखक - जयंत नारळीकर]])
* शेवटचा दिस - (लेखक - [[यशवंत रांजणकर]])
 
<big><u>काही प्रसिद्ध विज्ञान कथासंग्रह</u></big>
* गर्भार्थ -  (लेखक - बाळ फोंडके )
* दृष्टीभ्रम ( लेखक -  बाळ फोंडके )
* दुसरा आइन्स्टाईन (लेखक -  लक्ष्मण लोंढे )
* यक्षाची देणगी (लेखक -  जयंत नारळीकर)
* अंतराळातील भस्मासूर ( लेखक -  जयंत नारळीकर) 
* सायबर कॅफे (लेखक -  बाळ फोंडके) 
* कालवलय (लेखक -  बाळ फोंडके)
* द्विदल ( लेखक - बाळ फोंडके )
* यंत्रलेखक  (लेखक -  निरंजन घाटे)
* भविष्य वेध (लेखक - निरंजन घाटे ) 
* दॅट क्रेझी इंडियन ( लेखक -  निरंजन घाटे) 
* स्पेसजॅक (लेखक -  निरंजन घाटे) 
* वामनाचे चौथे पाऊल ( लेखक -  सुबोध जावडेकर) 
* मृत्यूदूत (लेखक -  निरंजन घाटे)
* यंत्रमानवाची साक्ष (लेखक -  निरंजन घाटे) 
* गोलमाल ( लेखक -  बाळ फोंडके)
* खिडकीलाही डोळे असतात ( लेखक -  बाळ फोंडके)
* जीवनचक्र  (लेखक -  निरंजन घाटे  ) 
* स्वप्नचौर्य (लेखक -  निरंजन घाटे) 
* आकाशभाकीते ( लेखक -  सुबोध जावडेकर )
* व्हर्चुअल रियॅलिटी (लेखक -  बाळ फोंडके )
* युरेका ( लेखक - डॉ . बाळ फोंडके)
* अमानुष (लेखक - डॉ . बाळ फोंडके)
* रोबो फिक्सिंग ( लेखक -  निरंजन घाटे)  
* जीवनचक्र  (लेखक -  निरंजन घाटे)
* संगणकाची सावली ( लेखक -  सुबोध जावडेकर)
* गुडबाय अर्थ ( लेखक -  बाळ फोंडके) 
* कर्णपिशाच्च ( लेखक -  बाळ फोंडके) 
* चिरंजीव ( लेखक - . बाळ फोंडके )
* ऑफलाईन (लेखक - बाळ फोंडके )
* अखेरचा प्रयोग ( लेखक -  बाळ फोंडके)
* पुढल्या हाका ( लेखक -  सुबोध जावडेकर) 
* २२ जुलै १९९५ (लेखक -  लक्ष्मण लोंढे)
* रिमोट कंट्रोल ( लेखक -  लक्ष्मण लोंढे )
* थँक यू मिस्टर फॅरॅडे ( लेखक - लक्ष्मण लोंढे ) 
* पुनर्जन्म ( लेखक - माधुरी शानबाग )
* मुंगी उडाली आकाशी (लेखक - माधुरी शानबाग)
* इंद्रधनुष्य ( लेखक - माधुरी शानबाग)
* सॅप (लेखक - माधुरी शानबाग) 
* प्रिमजाल मान ( लेखक - मेघश्री दळवी )
* वसूदेवे नेला कृष्ण ( लेखक - शुभदा गोगटे)
* अस्मानी ( लेखक - शुभदा गोगटे )
* आरंभ - (लेखक - मेघश्री दळवी)
* गुगली ( लेखक -  सुबोध जावडेकर )
 
==हेही वाचा==