"अतिनील किरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Blue_sun.jpg|thumb|right|सूर्याच्या कोरोनाचे (किरीटाचे) {{मराठी शब्द सुचवा}} अतिनील किरणांत घेतलेले छायाचित्र]]
अतिनील किरणे ही [[सूर्य]]प्रकाशात आढळणारी किरणे आहेत. त्यांची [[तरंगलांबी]] ही [[दृश्य प्रकाश किरणे|दृश्य प्रकाश किरणांपेक्षा]] छोटी म्हणजे १०० ते ४०० नॅनोमीटर असते. सूर्यप्रकाशाचा केवळ ७% भाग ह्या किरणांनी व्यापलेला असतो. वातावरणातील [[ओझोन]]चा थर अतिनील किरणांना [[पृथ्वी]]च्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. सूर्यप्रकाशाच्या वर्णपटातील जांभळ्या पट्ट्याच्या पलीकडचा, साध्या डोळ्यांनी न दिसणारा पट्टा म्हणजे अतिनील किरण अर्थात अल्ट्रा व्हायोलेट किरण. याची तरंग लांबी सु. ४००० ॲगस्ट्रॉम एककापर्यंत असते. यास जंबूपार किरण असेही म्हणतात. ही एक प्रकारची [[उर्जा]] आहे.
==परिणाम==
तीव्र स्वरूपातील अतिनील किरणे [[सजीवासजीव|सजीवांसाठी]] हानीकारक असतात. त्यांच्यामुळे [[त्वचा|त्वचेची]] [[प्रतिकार शक्ती]] कमी होऊन त्वचेचा [[कर्करोग]] होतो. याशिवाय [[गुणसूत्रे|गुणसूत्रांचे]] उत्परिवर्तन (mutation) होते. [[पेशी]]तील [[प्रथिने]] आणि केंद्रकाम्लासारख्या (nuclein acid) सूक्ष्म रेणूंना झळ पोहोचते. अतिनील किरणांतील ऊर्जेमुळे त्वचेतील मुख्यत: पेशी केंद्रकाम्लाला (डीएनए) हानी पोहोचते. याचा परिणाम म्हणून विविध प्रथिने आणि विकारांची निर्मिती होते. यातील काही प्रथिनांमुळे सूक्ष्म रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व त्या ठिकाणी लालसरपणा येतो. [[सूज]], [[वेदना]] अशी [[लक्षणे]] दिसू लागतात. प्रखर किरण त्वचेवर पडल्यानंतर चार ते सहा तासानंतर ही [[प्रथिने]] तयार होतात. म्हणजेच सनबर्नची लक्षणे लगेच दिसत नाहीत. अतिनील किरणांमुळे हानी पोहोचलेल्या डीएनए पेशी केंद्रकाम्लाला पूर्वस्थितीत आणण्याची क्षमता शरीरात असते. पण [[त्वचा]] अधिक काळ अतिनील किरणांच्या सान्निध्यात राहिल्यास ते कठीण होते. तसेच डीएनएमध्ये[[डीएनए]]मध्ये बदल घडल्यास त्वचेचा [[कर्करोग]] होण्याचाही धोका असतो. सूर्याच्या अतिनील किरणांचा सामना कराव्या लागणा-या स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या[[प्रसूती]]च्या वेळी अधिक गुंतागुंत होते असे म्हंटले जाते. अतिनील किरणांचे असे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. [[वनस्पती]] पेशींवरही अतिनील किरणांचा परिणाम होतो. पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊन उत्पादन कमी होते. अन्नसाखळीच्या तळाशी असणार्‍या फायटोप्लॅंक्टन हे सुक्ष्म [[शेवाळ]] (जलीय वनस्पती) अतिनील प्रारणांमुळे नष्ट होऊ शकतात.
==उपयोग==
[[पाणी]] निर्जंतूक करण्यासाठी याचा महत्त्वाचा उपयोग होतो. यासाठी अतिनील किरण पाण्यातून नेतात. आयआयटी चेन्नईच्या[[चेन्नई]]च्या संशोधकांनी [[कोळसा]] आणि अतिनील किरण यांच्यापासून हवा शुद्धीकारक यंत्र तयार केले आहे. अतिनील किरणांनी [[जीवाणू]] व [[विषाणू]] मारले जातात नंतर शुद्ध हवा बाहेर येते. अतिनील किरण जरी अनेक प्रकारच्या जीवांणूंना नष्ट करू शकत असले तरी सर्व जीवाणूंना नष्ट करू शकत नाहीत. [[निर्जंतुकीकरण]] पद्धतीमध्ये अतिनील किरण, इलेक्ट्रॉन शलाका, [[क्ष-किरण]], किंवा आणवीयआण्वीय कणांचा वापर आवश्यकतेनुसार करतात. यातील अतिनील किरणांमुळे [[आयनीकरण]] होत नाही. विविध तरंगलांबीमध्ये निरीक्षणे घेऊ शकणाराशकणारी भारताची [[अंतराळ दुर्बीण]] [[अॅस्ट्रोसॅट]] दूरवरील अतिनील किरणे शोधून अवकाश संबंधित निरिक्षणे करते. अतिनील आणि क्ष-किरण यांतील विविध तरंगलांबीमधली माहिती खगोलीय वस्तूंच्या स्वरूपाबद्दलची रहस्ये उलगडण्यास मदत करते. टायटॅनियम डायऑक्साइड अतिनील किरण शोषून घेते.
पाणी निर्जंतूक करण्यासाठी याचा महत्त्वाचा उपयोग होतो.
आयआयटी चेन्नईच्या संशोधकांनी [[कोळसा]] आणि अतिनील किरण यांच्यापासून हवा शुद्धीकारक यंत्र तयार केले आहे. [[निर्जंतुकीकरण]] पद्धतीमध्ये अतिनील किरण, इलेक्ट्रॉन शलाका, [[क्ष-किरण]], किंवा आणवीय कणांचा वापर आवश्यकतेनुसार करतात. यातील अतिनील किरणांमुळे [[आयनीकरण]] होत नाही. विविध तरंगलांबीमध्ये निरीक्षणे घेऊ शकणारा भारताची अंतराळ दुर्बीण [[अॅस्ट्रोसॅट]] दूरवरील अतिनील किरणे शोधून अवकाश संबंधित निरिक्षणे करते. अतिनील आणि क्ष-किरण यांतील विविध तरंगलांबीमधली माहिती खगोलीय वस्तूंच्या स्वरूपाबद्दलची रहस्ये उलगडण्यास मदत करते.
==प्राणी==
विशिष्ट प्राण्यांमध्ये मानवाला दिसू न शकणारे अल्ट्रा व्हायोलेट अर्थात अतिनील किरण पाहण्याची क्षमता असते.