"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
 
==हिरवा चाफा==
हिरवा चाफा (शास्त्रीय नाव Artabotrys odoratissamus) ही एक सुवासिक फुले देणारी वेली आहे. चढण्यास आधार मिळाला नाही तरे हा वेल आपसात पकडी घेऊन एखाद्या झुडपासारखा गोळा होऊन राहतो. वेलाच्या फुलाच्या डेखाआधी एक आकडी असते. तिने आधार पडून वेल वर चढते. हिरव्या चाफ्याची पाने दाट हिरवी., गुळ्गुळीत व चकवकीत असतात. पानांच्या बगलात चार सेंटिमीटर लांबीची सुवासिक हिरवीगार फुले येतात, ती जोडीची किंवा एकेकटी असतात. दाट हिरव्या पालवीत लपलेले छोटे फूल त्याच्या हिरव्या रंगामुळे एका नजरेत सहसा दिसत नाही.
 
बाळ फुलाला वास येत नाही. ज्या दिवशी फूल तयार होते, त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध फूल पिकून पिवळे झाल्यावर जास्तच दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असे म्हणतात. हिरव्या चाफ्याचा सुगंध दडत नाही.
 
चीन आणि जावा या देशांत हिरवा चाफा विपुल प्रमाणात आढळतो.
 
हिरव्या चाफ्याच्या झाडाला फळेही हिरवीगार लागतात. लंबगोलाकार टोकाला निमुळती असलेल्या या फळांचे घड लागतात. त्याच्या बीपासून रोप तयार करता येते.़
 
 
==भुईचाफा==.
"https://mr.wikipedia.org/wiki/चाफा" पासून हुडकले