"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) (संपादनासाठी शोध संहिता वापरली) |
|||
[[वस्तुमान]] असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला '''गुरुत्वाकर्षण''' असे म्हणतात. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे [[त्वरण]] आणि [[वस्तुमान]] यांच्या गुणाकाराएवढे बल. या क्षेत्रात अफाट संशोधन होऊनही दूरदूर ठेवलेल्या दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण का असते हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाही.
गुरुत्वाकर्षण हे [[विद्युतचुंबकत्व]] आणि नाभिकीय दृढ अंतर्प्रभाव व अदृढ अंतर्प्रभाव ह्या तिघांसोबत प्रकृतीतील चार मूलभूत अंतःप्रभावांमधील एक आहे. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम [[आयझॅक न्यूटन]] यशस्वी ठरला. त्याने [[न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम]] मांडला. गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता [[अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइनच्या]] [[साधारण सापेक्षता सिद्धान्त|
विश्वनिर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर गुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले पदार्थ संगठित होऊन अखंड राहतात. त्यामुळेच ग्रह, तारे व दीर्घिकांसारख्या स्थूल वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अश्या कक्षासुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन व भरती-ओहोटी अशा पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर गोष्टींमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे.
|