"एटीएम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ५ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot v.2
छो (Pywikibot v.2)
 
====स्विच====
सन १९९६मध्ये भारतीय बँक महासंघाने पुढाकार घेत भारतात पहिला “ स्वधन ” नांवाचा स्विच उभा केला. सर्व सरकारी व कांही प्रमुख खाजगी बँका यांचा हा सहकारी व महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. याच्या पेमेंट अॅन्डॲन्ड सेटलमेंटचे व्यवस्थापन बँक ऑफ इंडियाने सांभाळले होते. व्यावसायिकतेपेक्षाही सहकार्य या तत्त्वावर ६७ शहरांतून ५६ बँकांची अदमासे १००० एटीएम्स जोडली गेली होती.रोजचे सुमारे २५०० व्यवहार या नेटवर्कवर होत होते. प्रति व्यवहार ५५ रुपये एवढे शुल्क पडत असे. एटीएम ही प्रतिष्ठेची बाब म्हणून समजली जायची.. मौजेची गोष्ट अशी, की काढल्या रकमेची खात्यावर नोंद लगेच न होता तिसऱ्या दिवशी होई. कारण सरकारी बँकांतले तंत्रज्ञान अद्याप बाल्यावस्थेत होते, व्यवस्थापनाची इच्छाशक्ती दुर्बळ होती आणि कर्मचारी संघटनांचा एकूण पवित्रा पाहता त्याला बाळसे येणे दुर्घट दिसत होते. अशा काळात “स्वधन” उदयास आले आणि ६-७ वर्षे चालू राहिले हीच अजब गोष्ट मानावी लागेल. पुढे या स्विचच्या सेवाप्रदात्याचे संगणकप्रणाली विक्रेत्याशी घटके उडाल्याने सान २००३च्या वर्षअखेरीस हा “स्वधन” स्विच बंद झाला.
 
“स्वधन” बंद पडले, तरी स्विचची आवश्यकता सदस्य बँकांना मनोमन पटली होता असे दिसते. कारण लगेचच “स्वधन” च्या बंद पडण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याकरता बँकांनी एकत्र येऊन पर्यायी स्विचच्या उभारणीस चालना दिलेली होती. २००३मध्येच MITR, CASHTREE, तर २७ फेब्रुवारी २००४ रॊजी BANCS असे स्विच अवतीर्ण झाले. परंतु प्रत्येक स्विच कांही मर्यादित सदस्य बँकांना सेवा पुरवीत असे. त्यामुळे मर्यादा पडणे अटळ होते. सर्व एटीएम्स एका छत्राखाली येणे आवश्यक होते आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ, कायमस्वरूपी भांडवली खर्च याची जुळवणी करणे महाकठीण कार्य होते. निव्वळ भौगोलिकदृष्ट्या ह्या देशाचा पसारा एवढा प्रचंड आहे, की हा व्याप फारच अजस्र ठरणार हे निश्चित. त्यामुळे २७-८-२००४ रोजी हैदराबादस्थित IDRBT (Institute for Development and Research in Banking Technology) या रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतल्या संस्थेने National Financial Switch (NFS) ची उभारणी केली तेव्हा खऱ्या अर्थाने भविष्यातल्या जबाबदाऱ्या पेलणारा समर्थ स्विच देशास मिळाला. आजमितीला देशातली जवळपास प्रत्येक बँक या स्विचची सदस्य आहे, आणि याच्या छत्राखाली सुमारे ४८ हजार एटीएम्स आहेत. प्रत्येक एटीएम व्यवहारावर पडणाऱ्या शुल्काचा ठरावीक भाग हा या NFS च्या उत्पन्नाचा भाग होता. आपल्या बँकेच्या एटीएममधून काढलेल्या रकमेवर शुल्क पडत नसे; पण अन्य बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास माफक शुल्क पडे. वगे उल्लेख केल्याप्रमाणे, हे शुल्क स्विच आणि एटीएमबँक ठरावीक प्रमाणात वाटून घेत.एटीएम वापरल्याबद्दल बँकेला आणि नेटवर्क वापरल्याबद्दल स्विचला मोबदला मिळे. शुल्क किरकोळ असल्याने ग्राहकाला त्याचा भारही वाटत नसे.
६३,६६५

संपादने