"हत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
 
हत्ती जंगलात कळपाने राहतात. एकेका कळपात सात-आठपासून २०-२५ पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्याने दोन-तीन मोठ्या माद्या आणि बच्चे असतात. नर कळपात नसतात. कळपात जसे मध्यम वयाचे बच्चे असतात, तसे अगदी लहान बछडेदेखील असतात. कळपाचे नेतृत्व म्हाताऱ्या अनुभवी मादीकडे असते. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो. केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन कंपू करून राहतात. वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघेही ठराविक मोसमात मदावर किंवा माजावर येतात. त्यांना ‘मदमस्त’ किंवा ‘मस्त हत्ती’ असे म्हणतात. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात. माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात. माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.
 
==खाद्य==
हत्ती मुख्यत: गवत, झाडपाला, पाने, फळे, फुले खातात. ऊस हे हत्तीचे आवडीचे खाद्य. त्याचबरोबर नारळ, केळीदेखील त्याला आवडतात. हत्ती सर्व खाद्यपदार्थ सोंडेने उचलून तोंडात धरतो. या लांब सोंडेचा त्याला हातासारखा उपयोग होतो. हत्तींना पाण्यात डुंबायला फार आवडते. पाण्यात असतानादेखील ते सोंडेत पाणी घेऊन फवाऱ्यासारखे डोक्यावर सोडतात. हत्तीची छोटी पिले कित्येकदा सोंडेत पाणी घेऊन एकमेकांवर फवारण्याचा खेळ खेळतात. सोंड हे हत्तीचे नाक आहे. ते सोंडेने श्वासोच्छवास करतात. हत्तीची सोंड आणि कान फारच मोठे असतात. त्यामुळे हत्तीला त्याच्या शत्रूच्या अंगाचा वास लांबूनच येतो. तसेच शत्रूच्या हालचालीमुळे झालेला आवाजही त्यांना दुरूनच ऐकू येतो. त्यामुळे शत्रू दूर असला तरी त्याची चाहूल हत्तीला लागते. हत्ती ७०-८० वर्षे जगतो.
 
[[वर्ग:प्राणी]]
[[वर्ग:हत्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हत्ती" पासून हुडकले