"ब्रिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
"ब्रिक्स" ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: [[BRICS]] ) हे [[भारत]], [[ब्राझील]], [[रशिया]], [[चीन]] आणि [[दक्षिण आफ्रिका]] या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे.सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि "[[ब्रिक]]" या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०११मध्ये दक्षिण आफ्रिका शामिल झाल्यावर याचे नाव बदलण्यात आले.
 
ब्रिक्सची पहिली परिषद [[इ.स. २००९]] मध्ये पार पडली.
 
== ब्रिक्स राष्ट्र समूहाविषयी ==
[[इ.स. २०१३]] मध्ये ब्रिक्सची पाचवी परिषद दक्षिण आफ्रिकेतील [[डर्बन|डरबन]] याठिकाणी पार पडली. या परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून [[मनमोहन सिंग]] हजर होते.
 
गोल्डमन सॅकने ब्रिकच्या चार राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा वेगवेगळा आणि एकत्रित संशोधन- अभ्यास करून आपलं प्रमेय मांडलं आणि वेळोवेळी त्याची समीक्षा करून त्यात सुधारणा केली. गोल्डमन सॅकने या चार राष्ट्रांनी काय करावं हे कधीच सुचवलं नाही वा त्यावर भाष्यपण केले नाही. परिणामत: जसजशी प्रमेयाची पकड घट्ट होत गेली तसतशी चार राष्ट्रं परस्परांजवळ येत गेली. अजूनही ब्रिक हा अनौपचारिक राष्ट्रसमूहच आहे. २००८ साली चार राष्ट्रांचे परदेशमंत्री प्रथम एकत्र आले. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर ब्रिकला अधिक जवळ येण्याची निकड वाटली नि म्हणून १६ जून २००९ रोजी चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एडातरीनबर्ग येथे संपन्न झाली. विशेष गोष्ट अशी की, ब्रिकची चारही राष्ट्रं जी-२० या प्रगत नि प्रगतीपथावर असणाऱ्या राष्ट्रांच्या अनौपचारिक राष्ट्रसमूहाचे सदस्य आहेत.
 
जी-२० या राष्ट्रसमूहांत ब्रिकचा आवाज बुलंद झाला. पहिल्या शिखर परिषदेत चीन आणि भारत यांनी जगाच्या अर्थमंचावर असलेलं ब्रिकचं स्थान त्याला मिळालंच पाहिजे या दिशेने वाटचाल केलीय. जगाच्या भूमीच्या जवळपास एक चतुर्थाश भूमी ब्रिकच्या राष्ट्रसमूहाने व्यापली आहे. तसंच जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या ब्रिक राष्ट्रसमूहाची आहे. जगाच्या जी.डी.पी.च्या ४० टक्के जी.डी.पी. ब्रिक राष्ट्रसमूहाचा आहे. याचा साकल्याने विचार करून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या चार राष्ट्रांनी परस्परांतलं सहकार्य नि संघटन वाढविण्यावर भर दिला.
 
ब्रिक्स देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला आर्थिक पाठबळ पुरविण्यासाठी या व्यापारी संघटनेने [[ब्रिक्स बँक|ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक]] स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.esakal.com/esakal/20120331/4999708832457979097.htm | शीर्षक="ब्रिक्‍स' स्थापणार "साउथ साउथ डेव्हलपमेंट बँक' | ॲक्सेसदिनांक=२० एप्रिल २०१४ | प्रकाशक=सकाळ | लेखक= | दिनांक=३१ मार्च २०१२ | भाषा=मराठी }}</ref><ref>{{cite websantosh | दुवा=http://prahaar.in/world/75271 | शीर्षक=ब्रिक्स बँक स्थापनेचा मार्ग मोकळा | ॲक्सेसदिनांक=२० एप्रिल २०१४ | प्रकाशक=प्रहार | लेखक=पी.टी.आय. | दिनांक=२७ मार्च २०१३ | भाषा=मराठी }}</ref><ref>{{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/edit/dhavte-jag/-/articleshow/19250873.cms? | शीर्षक='ब्रिक्स'ची बँक | ॲक्सेसदिनांक=२० एप्रिल २०१४ | प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स | लेखक= | दिनांक=२८ मार्च २०१३ | भाषा=मराठी }}</ref>
 
 
Line ५६ ⟶ ५८:
{{संदर्भयादी}}
 
 
{{साचा:आंतरराष्ट्रीय संस्था}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय संघटना]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना]]
[[वर्ग:चीनचे परराष्ट्रीय संबंध]]
[[वर्ग:ब्राझिलचे परराष्ट्रीय संबंध]]
[[वर्ग:भारताचे परराष्ट्रीय संबंध]]
[[वर्ग:रशियाचे परराष्ट्रीय संबंध]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्रिक्स" पासून हुडकले