"आपटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
==उपयोग==
आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आआःएआहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते.. पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो.
 
आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
 
अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।
 
पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा.
 
==धार्मिक महत्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/आपटा" पासून हुडकले