"गनिमी कावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
 
==गनिमी कावा म्हणजे काय?==
शिवाजी महाराजांनी वापर केलेल्या केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ असे आहेत. 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दाला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रूवरचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला.
 
मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या संदर्भात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो. म्हणजे 'गनिमी कावा' ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दप्रयोगात मराठ्यांची अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' असाच करताना मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही.