"नंदू होनप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
नंदू होनप (जन्म : इ.स. १९५२१९५३; मृत्यू : मुंबई, १७ सप्टेंबर, इ.स. २०१६) हे एक मराठी संगीतकार आणि व्हायोलिनवादक होते.
 
पु. ल. देशपांडे अकादमीत मिनी थिएटरमध्ये चाललेल्या 'सूरसाधना' या कार्यक्रमात शैलेश भागवत यांचे सनईवादन आणि नंदू होनप यांचे व्हायोलिनवादन अशी जुगलबंदी सुरू होती. कार्यक्रम ऐन टिपेला गेल्यानंतर होनप यांनी त्यांचे अत्यंत लोकप्रिय असे, 'निघालो घेऊनि दत्ताची पालखी' हे गीत वाजविले. त्यानंतर पुढे 'दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा' व्हायोलिनवर वाजविण्यास सुरूवात केल्यानंतर, त्यांचे भान हरपले आणि अशी सूरसमाधी लागली असतानाच, ते अचानक कोसळले. तो हृदयविकाराचा तीव्र धक्का होता. त्यातच होनप यांनी अखेरचा श्वास घेतला.
"https://mr.wikipedia.org/wiki/नंदू_होनप" पासून हुडकले