"आदेश श्रीवास्तव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या पानावरील सगळा मजकूर काढला
ओळ १:
'''आदेश श्रीवास्तव''' ([[४ सप्टेंबर]], [[इ.स. १९६६]]:[[जबलपूर]], मध्य प्रदेश, [[भारत]] - [[५ सप्टेंबर]], [[इ.स. २०१५]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]], भारत) हे एक भारतीय गायक व संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते. [[आओ प्यार करें]] हा त्यांचा पहिल प्रदर्शित चित्रपट होता. याआधी त्यांनी कन्यादान या अप्रदर्शित चित्रपटाला संगीत दिले होते.
 
२००५ साली आदेश श्रीवास्तव दूरचित्रवाणीवरील [[सा रे गा मा पा - २००५]] या गायनस्पर्धेचे परीक्षक होते. पुढच्याच वर्षी त्यांना बालवेश्या व्यवसायावरील [[सना]] नावाचा छोटा चित्रपट दिग्दर्शित केला.
 
[[अकॉन]], [[ज्युलिया फोरदॅम]], [[डॉमिनिक मिलर]], [[टी-पेन]], [[शकिरा]] आणि [[वायसिफ जीन]] या परदेशी गायकांबरोबर आदेशने काही गाणी गायली. हिटलॅब.कॉम नावाच्या संकेतस्थळावर आदेश श्रीवास्तव यांनी अकॉनला बरोबर घेऊन, भारतस्तरीय कलाकार-शोधाचे कार्यक्रम केले. गाण्याचे तज्ञांकडून विश्लेषण करून, कोणत्या गायकाचे कोणते गाणे गाजेल याचा आगामी अंदाज या कार्यक्रमात केला जात असे.
 
[[इ.स. २०००]] नंतर आदेश श्रीवास्तव यांचे संगीत फारसे प्रसिद्ध झाले नाही.
 
==कौटुंबिक माहिती==
[[विजयेता पंडित]] ही आदेश श्रीवास्तवची पत्नी आहे. नाव संगीत दिग्दर्शक [[जतीन-ललित]] हे तिचे भाऊ आणि अभिनेत्री [[सुलक्षणा पंडित]] ही बहीण आहे. आदेशच्या चित्रेश श्रीवास्तव या मोठ्या भावाची [[आयलाइन टेलिफिल्म]] नावाची कंपनी [[राहत फतेह अली खान]]च्या काळ्या पैशाच्या प्रकरणात बदनाम झाली होते.
 
==आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेले हिंदी चित्रपट==
* [[अंगारे]] (सहसंगीतकार [[अन्‍नू मलिक]])
* [[उलझन]]
* [[आओ प्यार करें]]
* कन्यादान (अप्रकाशित, १९९३)
* [[कुँवारा (२००० चित्रपट)|कुँवारा]] (२०००)
* [[कभी खुशी कभी गम]]
* [[चलते चलते]] (सह संगीतकार [[जतीन-ललित]])
* [[चिनगारी]]
* [[तरकीब]] (२००१)
* [[दहक]]
* दीवार (नवीन) (अन्य संगीतकारांसह)
* देव (अन्य संगीतकारांसह)
* बडे दिलवाला
* बस इतना सा ख्वाब है
* [[बागबान]]
* बाबुल (नवीन) (अन्य संगीतकारांसह)
* [[मेजरसाब]]
* [[लाल बादशाह]]
* [[वेलकम बॅक]]
* शस्त्र (१९९६)
* शिकारी (२००१)
* [[सलमा पे दिल आ गया]]
 
==आदेश श्रीवास्तव यांनी गायलेली काही प्रसिद्ध गाणी==
* किसका चेहरा (चित्रपट - तरकीब)
* क्या अदा है क्याजलवे है तरे पारो (चित्रपट - शस्त्र, १९९६)
* गुस्ताखियाँ
* मोरा पिया (चित्रपट राजनीती)
* ये हवाएँ (चित्रपट - बस इतना सा ख्वाब है)
* शावा शावा
 
==आदेश श्रीवास्तव यांचे संगीत असलेली काही गाणी==
* ओ सजना दिलवर (गायक-गायिका उदित नारायण-लता, चित्रपट - कन्यादान)
* गुमशुदा (चित्रपट - चलते चलते)
* जाने तमन्‍ना (चित्रपट - कन्यादान)
* पहेली नजर में तूने ये क्या किया (गायक-गायिका उदित नारायण-लता, चित्रपट - अंगारे)
* सुनो ना, सुनो ना (चित्रपट - चलते चलते)
* सोना सोना (गायक - [[सुदेश भोसले]]; चित्रपट - मेजरसाब)
* हाथों में आ गया जो कोई (चित्रपट - आओ प्यार करें)
 
{{DEFAULTSORT:श्रीवास्तव, आदेश}}
[[वर्ग:इ.स. १९६६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट संगीतकार]]