Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १६३:
[[वर्ग:विदर्भ निवासी]]
[[वर्ग:विकिपीडिया प्रचालक]]
 
----
"बहुतेक सदस्य इंग्रजी विकिवरही काम करतात.त्यांनाही ते वाचन करुन समजणे सोयीचे जाते तसेच, मूळ वाक्यास भाषांतराचे साधर्म्य हवे", असे तुमचे मत पटण्यासाखे नाही.
 
पहिली गोष्ट मराठी विकिपीडिया हा स्वतंत्र विकिपीडिया आहे, त्यात इंग्रजीचे भ्रष्ट भषांतर असणे उचित नाही. मी मराठी विकीवर शेकडो लेख लिहिले, त्यांतला माझ्या आठवणीप्रमाणे एकही भाषांतरित नाही.
 
स्रोत या शब्दाचा येथे काय उपयोग आहे हे तुम्ही स्पष्ट केलेले नाही. स्रोत म्हणजे मूळ किंवा उगम. स्रोत संपादित करा म्हणजे मूळ संपादित करा. कुणाकुणाचे मूळ? कुणाची मुळे? कुणाकुणाचे उगम? ... ज (चर्चा) १६:१०, ७ सप्टेंबर २०१६ (IST)
 
==अश्याच प्रकारचे दोष==
‘अश्याच प्रकारचे दोष’ हे चुकीचे मराठी आहे. असा प्रकार->असे प्रकार->अशा प्रकारचे->अशा प्रकारांचे. प्रकार हा शब्द पुल्लिंगी आहे, म्हणून ‘अश्या’ हे स्त्रीलिंगी रूप होणार नाही.
 
ससा->सशाने->ससे->सशांनी
 
मासा->माशाने->मासे->माशांनी
 
स्त्रीलिंगी : अशी स्त्री->अश्या स्त्रिया; माशी->माशीने->माश्या->माश्यांनी
 
नपुंसकलिंगी : असे पुस्तक->अशा पुस्तकाने->अशी पुस्तके->अश्या पुस्तकांनी ... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १९:०४, ७ सप्टेंबर २०१६ (IST)