"बलुचिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३:
 
== इतिहास ==
जग जिंकण्याच्या ईर्ष्येने युरोपातल्या मॅसिडोनियाचा राजा अलेक्झांडर हा पूर्वेकडे निघाला. पॅलेस्टाईन, अनातोलिया, बॅबिलोनिया, असीरिया इत्यादी प्रदेश जिंकत तो प्रचंड अशा पर्शियन साम्राज्यावर धडकला. भीषण युद्ध झाले आणि पर्शियन सम्राट दुसरा दरायस याच्या सैन्याचा पूर्ण पराभव झाला.. विशाल पर्शियन साम्राज्य अलेक्झांडरच्या एकाच धडकेत कोसळले आणि गर्वाने, बलाने उन्मत्त झालेला अलेक्झांडर भारताच्या वेशीवर येऊन थडकला. इथे त्याची गाठ अनेक छोट्या छोट्या गणराज्यांशी पडली. एक नगर म्हणजे एक राज्य, इतकी छोटी असणारी ही गणराज्ये तलवारीला भलतीच तिखट होती. त्यांनी अलेक्झांडरला दमवले आणि रडवले. सिंधू नदीच्या काठावर राजा पुरू किंवा पोरसाची गाठ पडण्यापूर्वीच अलेक्झांडरचा अर्धा दम उखडला गेलेला होता. या अनेक गणराज्यांमध्ये एक किरात जमातीचे राज्य होते. म्हणजेच आधुनिक जगातले पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातले कलात नावाचे एक शहर. ऋग्वेद काळातलाकाळातली [[भलान]] जमात आणि बौद्ध ग्रंथांमधला बलोक्ष यांचा देश म्हणजेच आजचा बलोक्षस्थान किंवा बलुचिस्तान.
 
प्राचीन किरातांप्रमाणेच आधुनिक बलुची देखील उत्तम लढवय्ये आहेत. इंग्रजांनी भारतातल्या काही जमातींना ‘लढवय्या जाती-मार्शल रेसेस’ असं नाव दिले होते. अशा जातींमधून इंग्रजांच्या भारतीय सैन्यात म्हणजे रॉयल इंडियन आर्मीमध्ये नियमित सैन्यभरती केली जात असे. त्यामध्ये एक बलुच रेजिमेंट होती.