"भावगीते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मराठी प्रकार आहे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीताचा जन्म होतो. भावगीत म्हणजेच मनातील भावांचे शब्दसुरांद्वारा प्रकटीकरण होय. [[जी.एन. जोशी]] हे मराठीतले आद्य भावगीत गायक समजले जातात. त्यानंतर आलेले [[गजानन वाटवे]] यांनी भावगीतांची आवड घरांघरांत पोहोचवली.
 
भावगीत या विषयावर प्रबंध लिहून [[शोभा अभ्यंकर]] यांनी पीएच.डी. मिळवली आहे. त्यांचे ‘सखी भावगीत माझे’ हे याच प्रबंधात आणखी भर घालून साध्यासोप्या भाषेत सादर केलेले पुस्तक आहे.
 
भावगीत हे एके काळी कोणत्या न कोणत्या रागावर आधारलेले असायचे. अशीच काही भावगीते खालील कोष्टकात दिली आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/भावगीते" पासून हुडकले