"जॉर्ज नथानियेल कर्झन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: बांधणी, removed: जन्म :
ओळ १:
लॉर्ड कर्झन म्हणजेच '''जॉर्ज नथानियेल कर्झन''', ''केडलस्टनचा पहिला मार्केस कर्झन'' (जन्म : [[जानेवारी ११]], [[इ.स. १८५९]] - मृत्यू : [[मार्च २०]], [[इ.स. १९२५]]) हा लॉर्ड एल्गिन नंतर [[:वर्ग:भारतातील इंग्लंडचे व्हाइसरॉय|भारताचा व्हाइसरॉय]] होता. तो त्याआधी [[इंग्लंड]]चा परराष्ट्रसचिव होता. व्हाईसरॉय पदावर येण्यापूर्वी तो भारतात चार वेळा येऊन गेला होता. त्याने आपल्या व्हाइसरॉयपदाच्या कारकिर्दीत [[बंगालची फाळणी]] केली<ref>http://asianhistory.about.com/od/india/ss/Photo-Essay-Colonial-India_4.htm</ref>. या फाळणीच्या विरोधात झालेल्या जनतेच्या आंदोलनानंतर ही फाळणी रद्द करण्यात आली. त्याने त्याच्या कारकिदीत बर्‍याच सुधारणा करण्याचा प्रयत्‍न केला. त्यांमध्ये पोलिस सुधारणा, शैक्षणिक सुधारणा<ref>http://www.kkhsou.in/main/education/education_policy.html</ref>, आर्थिक सुधारणा, न्यायालयीन सुधारणा, लष्करी सुधारणा वगैरे होत्या. इ.स. १८९९चा कलकत्ता महापालिका कायदा,<ref>http://www.shareyouressays.com/105261/essay-on-lord-nathaniel-curzons-manifold-reforms-of-1899</ref>, १९०४ सालचा प्राचीन स्मारक संरक्षण कायदा हे त्याच्याकारकिर्दीत झाले.<ref>http://asi.nic.in/asi_aboutus_history.asp</ref> ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी लॉर्ड कर्झनने राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे [[विक्टोरिया मेमोरिअल हॉल]] उभारला<ref>http://victoriamemorial-cal.org/architecture.html</ref>.