"आणीबाणी (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
'''आणीबाणी''' (Emergency) हा [[भारत]]ाच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात [[भारताचे पंतप्रधान|तत्कालीन पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] [[फकरुद्दीन अली अहमद]] ह्यांनी [[भारताचे संविधान|संविधानातील]] कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी [[२५ जून]] १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी [[लोकशाही]] स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या [[जयप्रकाश नारायण]], [[अटलबिहारी वाजपेयी]], [[जॉर्ज फर्नांडिस]] इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. [[रा.स्व. संघ]] व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.
 
मार्च १९७७ सालच्या [[१९७७ लोकसभा निवडणूक|लोकसभा निवडणुकांनंतर]] २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचा दारुण पराभव झाला व [[जनता पक्ष]]ाचे [[मोरारजी देसाई]] भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या [[रायबरेली (लोकसभा मतदारसंघ)|रायबरेली]] ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.