"जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११९ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
clean up using AWB
(इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा))
छो (clean up using AWB)
'''जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''George Herbert Walker Bush'') (१२ जून, इ.स. १९२४ - हयात) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८९ ते २० जानेवारी, इ.स. १९९३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा [[रॉनल्ड रेगन]] याच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १९८१ ते इ.स. १९८९ या कालखंडात अमेरिकेचा ४३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. तत्पूर्वी हा [[अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह|अमेरिकी प्रतिनिधिगृहात]] इ.स. १९६७ ते इ.स. १९७१ या काळात [[टेक्सास|टेक्सासाचा]] प्रतिनिधी होता. इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात याने ''सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी'', अर्थात ''सीआयए'' या गुप्तचरसंस्थेच्या संचालकपदाचीही धुरा वाहिली.
 
[[अमेरिकेची सेनेट]]सदस्य प्रेस्कॉट बुश व त्याची पत्नी डॉरथी वॉकर बुश या जोडप्याच्या पोटी [[मॅसेच्युसेट्स]] संस्थानातील मिल्टन गावी जॉर्ज याचा जन्म झाला. इ.स. १९४१मधल्या [[पर्ल हार्बरावरील हल्ला|पर्ल हार्बरावरील हल्ल्यानंतर]] जॉर्ज बुश महाविद्यालयीन शिक्षण सोडून वयाच्या १८व्या वर्षी [[अमेरिकी नौदल|अमेरिकी नौदलात]] वैमानिक म्हणून दाखल झाला. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] युद्धाच्या समाप्तीपर्यंत तो आघाडीवर लढला. युद्धानंतर त्याने [[येल विद्यापीठ|येल विद्यापीठात]] प्रवेश मिळवून इ.स. १९४८ साली पदवी अभ्यासक्रम पुरा केला. यानंतर तो आपल्या कुटुंबासह [[टेक्सास]] संस्थानात हलला. तेथे त्याने [[खनिज तेल]] उद्योगात शिरून धंद्यात जम बसवला. स्वतःचा तेलउद्योग स्थापल्यानंतर तो [[राजकारण|राजकारणातही]] सहभाग घेऊ लागला. अमेरिकी प्रतिनिधिगृहात त्याने टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले.
 
अध्यक्षीय कारकिर्दीत जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश याला आंतरराष्ट्रीय राजकारणास कलाटणी देणार्‍या अनेक घडामोडी व प्रसंग हाताळावे लागले : इ.स. १९८९ साली [[बर्लिन भिंत]] पाडली गेली, दोनच वर्षांमध्ये [[सोव्हियेत संघ]] विसर्जिण्यात आला, इ.स. १९९०-९१ सालांमध्ये [[पहिले आखाती युद्ध|आखाती युद्धात]] झाले. देशांतर्गत आघाडीवर बुश प्रशासनाला संसदेने अगोदर संमत केलेले करवाढीची विधेयके मंजूर करावी लागली. आर्थिक प्रश्नांमुळे इ.स. १९९२ सालतल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅट]] उमेदवार [[विल्यम जेफरसन क्लिंटन|बिल क्लिंटन]] याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.
{{कॉमन्स|George H. W. Bush|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/georgehwbush/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}
 
 
{{विस्तार}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
 
{{DEFAULTSORT:बुश,जॉर्ज एच.डब्ल्यू.}}
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:रिपब्लिकन पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी]]