"किशोर प्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २९:
}}
 
किशोर अमृतराव प्रधान (जन्म : १ नोव्हेंबर, १९३६) हे एक मराठी अभिनेते आणि मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक आहेत.. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरसह विविध पदांवर २८वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले आहेत. नव्याबेनव्यानेच सुरू झालेल्या नागपूर आकाशवाणी केंद्रावर सादर केलेले ‘भुतावळ’ नावाचे नाटक हे त्यांचे पहिले दिग्दर्शन. त्यानंतर विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी नाट्यदिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांची निवड झाली.
 
किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचे होते. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाट्यछटा लिहिणार्‍या आणि बसविणार्‍या होत्या. वडिलांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातीलच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले. किशोर प्रधान यांनी १८हून अधिक इंग्रजी नाटकांत भूमिका केल्या आहेत.
ओळ ३६:
 
==अभिनयाची कारकीर्द==
प्रधान रहात असलेल्या कॉलनीत सादर करायच्या एका नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्‌तास बस स्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायिकांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात नाटक कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर हे नाटक आले, प्रयोग तुफान रंगला. तो पाहून श्याम फडके यांनी नवीन नाटक लिहून दिले. त्या नव्याकोर्‍या ’काका किशाचा’(१९७०) या स्व-दिग्दर्शित नाटकाने किशोर प्रधान यांना लोक ओळखू लागले. पण त्यापूर्वीच २३ ऑक्टोबर १९६६ ला त्यांचे लग्न शोभा वकील यांच्याशी झाले होते. वर्तमानपत्रात बातमी आली, "सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभा वकील यांचा विवाह किशोर प्रधान यांच्याशी"
 
==नाटकाच्या ऑफर्स==