"लीळाचरित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
103.247.54.233 (चर्चा)यांची आवृत्ती 1389968 परतवली.
No edit summary
ओळ १:
पंडित म्हाइंभट सराळेकर हा लीळाचरित्राचा (श्रीचक्रपाणी चरित्र) कर्ता आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अलंकृतअनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व [[महानुभाव पंथ|महानुभाव]] वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे. रचना इ. स. १२७८.
 
==परिचय==
या ग्रंथात सुमारे साडेनऊशे ओव्या आहेत. एकांक-पूर्वार्ध-उत्तरार्ध असे या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. [[चक्रधरस्वामी|श्रीचक्रधरांचे चरित्र]] हा या ग्रंथाचा विषय आहे. लीळाचरित्राच्या यशाचे निम्मेअधिक श्रेय श्रीचक्रधरांच्या व्यक्तिमत्त्वाला जाते.
 
तत्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र लीळाचरित्रात उमटलेले आहे. त्यावेळचा समाज, चालीरीती, व्रतवैकल्ये, सणवार, वस्त्रेप्रावरणे, खाणीपिणी, नाणीगाणी, व्यापारटापार इत्यादी विविध अंगांचे दर्शन व स्थितिगती याची चांगली कल्पना लीळाचरित्रातून येते. नागदेव, बाइसे, आउसे, सारंगपंडित, जानोपाध्ये इ. अनेक व्यक्तींची स्वभावचित्रे या ग्रंथात आहेत. चरित्रकार म्हाइंभट चतुरस्र, साक्षेपी, कष्टाळू, प्रामाणिक, भावनिष्ठ शैलीकार आहे. लीळाचरित्राची प्रेरणा नागदेवाचार्य - म्हाइंभट संवादात आहे. भाषा, इतिहास, साहित्य, समाजदर्शन, तत्त्वज्ञान या सर्वच दृष्टींनी या ग्रंथाचे महत्त्व जाणवते.