"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
मराठी नाटक आणि एकपात्री प्रयोग या दोघांत मूलभूत फरक आहे. एकपात्रीत एकच कलाकार रंगमंचावर असतो. तो अभिनय, आवाज, हालचाली यातून आपली कला पेश करतो. पु. ल. देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ किंवा ‘असा मी असामी’ किंवा सुमन धर्माधिकारी यांची ‘घार हिंडते आकाशी’, वि. र. गोडे यांचे ‘अंतरीच्या नाना कळा’ तसेच सदानंद जोशी यांचे ‘मी अत्रे बोलतोय...’ याची दर्जेदार परंपरा लाभली आहे. प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’, राम नगरकर यांचे ‘रामनगरी’, लालन सारंग यांचे ‘मी आणि माझ्या भूमिका’, शिरीष कणेकर यांची ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’, ‘कणेकरी’, सुषमा देशपांडे यांची ‘व्हय मी सावित्रीबाई’, वसंत पोतदार यांचे ‘योद्धा सन्यासी’ यांनीही एकपात्रीच्या दालनात वैभव निर्माण केले.
 
[[दिलीप प्रभावळकर]] या अष्टपैलू अभिनेत्यानेही ‘माझ्या भूमिका’, ‘मुखवटे आणि चेहरे’ या एकपात्रीतून ही कला शिखरापर्यंत पोहोचविली. रोहिणी हट्टंगडी, सुलभा देशपांडे, कै. भक्ती बर्वे, सदानंद चांदेकर, व्यंगचित्रकार विकास सबनीस, श्रीकांत मोघे, विसूभाऊ बापट, अंजली कीर्तने, प्रा. प्रवीण दवणे, सुधीर गाडगीळ, विश्‍वास मेहेंदळे, बंडा जोशी, संजय मोने, सुरेश परांजपे असे मराठी एकपात्री कलाकार आज आहेत.
 
ज्योतिष, भविष्य यावर भाष्य करणारे शरद उपाध्ये यांचे राशीचक्र, डॉ. रविराज अहिरराव यांचे ‘वास्तुविराज’, विवेक मेहेत्रे याचे ‘राशीवर्ष’ यांनीही हाऊसफुल्ल प्रयोगांचे विक्रम रंगभूमीवर केले आहेत. एकूणच एकपात्री प्रयोगांचे अनेक विषय, आशय आहेत. त्यात संवाद, गप्पागोष्टी, किस्से, मार्गदर्शन, नाट्य हे आहे.