"शतपथ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
याज्ञवल्क्य यांची माहिती
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १०:
ब्रह्म हे अंतिम सत्य आहे या अथर्ववेदीय विचाराचा ऐतरीय ब्राह्मण (४०।५), '''शतपथ ब्राह्मण''' (१०।३।५; ११।२।३) व तैत्तिरीय ब्राह्मण (२।८।८।९; २।८।९।७) यांच्यावर खोल परिणाम झालेला दिसून येतो.
 
नैतिक जबाबदारीच्या कल्पनेच्या मुळाशी वेदातवेदांत सांगितलेली ऋण ही कल्पना आहे. तैत्तिरीय संहितेत (६।३।१०।५) म्हटले आहे की, "जन्माला येणारा ब्राह्मण तीन ऋणांसह जन्मतो. ऋषीचे ऋण ब्रह्मचर्याने, देवांचे यज्ञाने व पितरांचे ऋण प्रजोत्पादनाने फेडता येते." '''शतपथ ब्राह्मणात''' (१।७।२।१) हाच सिद्धांत ब्राह्मण शब्दाऐवजी मनुष्यमात्रांबद्दल सांगितला आहे. त्यात दुसरी सुधारणा अशी की या तीन ऋणांशिवाय मनुष्यऋण असे चौथे ऋण असल्याचे म्हटले आहे. --"जो अस्तित्वात येतो तो ऋणी असतो. देव, ऋषी, पितर व मनुष्य यांचे ऋण त्याला जन्मतः असते. देवांचे ऋण यज्ञाने व होमाने फिटते. अध्ययन केल्याने ऋषींचे ऋण फेडता येते. (विद्वानास ऋषींचा निधिरक्षक असे म्हणतात). संतत व अविच्छिन्‍न प्रजेची निर्मिती झाल्याने पितरांच्या ऋणातून मुक्ती मिळते. माणसांना अन्‍न व वस्त्र यांचे दान केल्याने मनुष्यऋण फिटते. जो ही सर्व कर्तव्ये करतो तो कृतकृत्य होतो. त्याने सर्व मिळवले, सर्व जिंकले असेच म्हटले पाहिजे.(१।७।२।१।-६)
 
वैदिककाळी भूमीची वाटणी होत नसे. राजालासुद्धा भूदानाचा अधिकार नव्हता. विश्वकर्मा भौवन या राजाने सर्वमेध केला तेव्हा तो कश्यप ऋषीस भूमिदान करू लागला. तेव्हा भूमी त्यास सांगते, " मला कोणताही मर्त्य देऊ शकत नाही. तू मूर्ख आहेस. तुझी मला कश्यपास दान देण्याची प्रतिज्ञा मिथ्या आहे. तू माझे दान केल्यास मी पाण्यात बुडून जाईन."--(ऐतरेय ब्राह्मण (३९।७), '''शतपथ ब्राह्मण''' (१३।७।१।१५).
ओळ १६:
शरीरशास्त्र, गर्भविज्ञान आणि निदानासह आरोग्य चिकित्सा या तीन शाखांचा वेदकाली प्रारंभ झाला होता. याची गमके वैदिक ब्राह्मणात सापडतात. '''शतपथ ब्राह्मण''' (कांड १० व ११) आणि अथर्ववेद (१०-२) यात मानवी शरीराची हाडे व अवयव पद्धतशीर रितीने मोजून सांगितले आहेत. '''शतपथ ब्राह्मणात''' माणसाच्या शरीरात ३६० अस्थी असतात असे सांगितले आहे. यजुर्वेद संहितांमध्ये शरीराच्या अवयवांची तपशीलवार नावेही सांगितली आहेत.
 
ग्रीक व रोमन संस्कृतींना दशांश पद्धत माहीत नव्हती. प्राचीन भारतीय गणिती [[आसा]] यांनी शून्याच्या संकल्पनेचा वापर करून अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची निर्मिती केली. भारतीयांनी दशांश पद्धतीच्या योगाने [[अंकगणित|अंकगणितात]] अधिक प्रावीण्य प्राप्त केले होते. गणितशास्त्रात शून्य या कल्पनेने क्रांती केली. इतकी प्रभावी कल्पना दुसरी कोणतीही नाही असे गणितवेत्ते म्हणतात. शून्य हा शब्द रिकामे किंवा पोकळ या अर्थी वेदातवेदांत ('''शतपथ ब्राह्मण''' २।३।१।९; तैत्तिरीय ब्राह्मण २।१।२।२) उपयोगात आणला आहे. 'शून्य आवसथ' म्हणजे रिकामे घर असा तेथे प्रयोग केला आहे. गणितातील अनन्त या कल्पनेचा पूर्ण या संज्ञेने उल्लेख शतपथ ब्राह्मणात(१४।८।१) व बृहदारण्यक उपनिषदात(५।१) आला आहे. ब्रह्माचे वर्णन करताना अनन्ताची ब्रेरीज येथे रूपकाने दाखवली आहे. असे म्हटले आहे की 'हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे, पूर्णातून पूर्ण बाहेर येते; पूर्णातून पूर्ण वजा केले की पूर्ण शिल्लक राहते.'
<div style="text-align: center;">
'''ओम्‌ पूर्णमदः पूर्णमिदम्‌, पूर्णात्पूर्णमुदच्यते।