"शतपथ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
याज्ञवल्क्य यांची माहिती
ओळ २:
प्रत्येक वेदाच्या संहिता सारख्या असल्या तरी त्यांचे ब्राह्मणनामक ग्रंथ व आरण्यके निराळी आहेत. उदाहरणार्थ, [[ऋग्वेद|ऋग्वेदाचे]] [[ऐतरेय ब्राह्मण]] व आरण्यक, [[कौषीतकी ब्राह्मण]] व आरण्यक, [[कृष्ण यजुर्वेद|कृष्ण यजुर्वेदाचे]] [[तैत्तिरीय ब्राह्मण]] व आरण्यक आणि [[शुक्ल यजुर्वेद|शुक्ल यजुर्वेदाचे]] '''शतपथ ब्राह्मण व [[बृहदारण्यक]], ''' [[सामवेद|सामवेदाचे]] पंचविंश ब्राह्मण, षत्‌विंश ब्राह्मण, जैमिनीय ब्राह्मण, जैमिनीय उपनिषद ब्राह्मण इत्यादी.
 
[[यजुर्वेद|यजुर्वेदाच्या]] १०१ शाखांपैकी सहाच शाखा आज उपलब्ध आहेत. या वेदाचे कृष्ण यजुर्वेद व शुक्ल यजुर्वेद असे मुख्य दोन भेद. तैत्तिरीय, काठक, मैत्रायणी व कापिष्ठल या कृष्ण यजुर्वेदाच्या तर काण्व व माध्यंदिन या शुक्ल यजुर्वेदाच्या शाखा. कृष्ण यजुर्वेदाच्या चारही शाखांच्या संहिता संमिश्र, म्हणजे मंत्र आणि ब्राह्मणे यांचे मिश्रण झालेल्या आहेत. त्यांच्यामधून विशेषतः तैत्तिरीय शाखेच्या संहितेतून व आरण्यकसहित ब्राह्मणातून वेगळा केलेला मंत्रात्मक भाग म्हणजे शुक्ल यजुर्वेद. हे काम वाजसनीचा पुत्र [[http://www.shyamjoshi.org/योगीश्वर-याज्ञवल्क्य/ याज्ञवल्क्य]] ऋषीने केले. कृष्णवेदातील ब्राह्मणभाग बाजूला सारल्यामुळे उरलेल्या मंत्रप्रधान शुक्लसंहितेसाठी निराळाच ब्राह्मणग्रंथ याज्ञवल्क्य मुनींच्या पंपरेत तयार झाला. हाच '''शतपथ ब्राह्मण''' होय.
 
यजुर्वेदामध्ये पुरुषरूप अग्नीची अग्निचयन नामक पूजा सांगितली आहे. परमपुरुष किंवा विश्वपुरुष अग्नीच आहे अशी भावना अग्निचयनात आहे. तैत्तिरीय संहिता, काठक संहिता, कापिष्ठल संहिता, मैत्रायणी संहिता, वाजसेनीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, तैत्तिरीय आरण्यक व '''शतपथ ब्राह्मण''' यात अग्निचयनाचा विधी विस्ताराने वर्णिला आहे. अग्निचयनात वैश्वानरहोम सांगितला आहे या वैश्वानराचे स्वरूप भू, अंतरिक्ष व द्युलोक म्हणजे त्रैलोक्य होय, असे '''शतपथ ब्राह्मणात''' (९।३।१।३) वर्णिले आहे. अग्निरहस्य नामक '''शतपथ ब्राह्मणाचे''' दहावे कांड आहे. त्यात अग्निचयनातील वैश्वानराचे स्वरूप सांगितले आहे. ते असे:--"द्युलोक त्याचे शिर, आदित्य त्याचा चक्षु, वायु त्याचा प्राण, आकाश त्याचे शरीर, जल त्याची वस्ती व पृथ्वी त्याचे पाय होत."