"बलवंत संगीत मंडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,०६६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
 
बलवंत संगीत मंडळीचा पहिला मुक्काम तात्यासाहेब परांजपे यांच्या [[ग्रँट रोड]]वरील पन्‍नालाल टेरेस या राहत्या जागेत होता. महिन्याभरात्च कंपनीची जुळवाजुळव झाल्यावर बोरीवलीत दाजीबा दांडेकर यांच्या बंगल्यात कंपनीने मुक्काम हलवला. मराठी रंगभूमीचे शिल्पकार [[बलवंत पांडुरंग किर्लोस्कर]] तथा [[अण्णासाहेब किर्लोस्कर]] आणि लोकमान्य बलवंत ऊर्फ [[बाळ गंगाधर टिळक]] यांना मानाचा मुजरा करण्याच्या उद्देशाने या नाटक मंडळीचे नाव बलवंत संगीत मंडळी ठेवण्यात आले. हे नाव [[राम गणेश गडकरी]] यांनी सुचवले.
 
==बलवंत संगीत मंडळीचा पडदा==
ज्या नाट्यगृहात बलवंत संगीत मंडळीच्या नाटकाचा प्रयोग होणार असेल त्या नाट्यगृहाच्या मंचाला कंपनीचा पडदा लावला जाई. हा दर्शनी पडदा हेतुनिदर्शक होता. पडद्याच्या वरच्या बाजूला अ्ण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या रेखांकित प्रतिमा होती, तर पडद्याच्या खालच्या बाजूवर लक्ष्मी आणि सरस्वती या येथे एकत्र नांदत आहेत आणि त्या दोघींची आमच्यावर सदैव कृपा राहो; सर्वांवर येर्णारी संकटे दूर करून सर्वांचे भले होवो; सर्वांच्या कामना पूर्ण होऊन सर्वजण नित्य आनंदात राहोत, अशा अर्थाचे दोन संस्कृत श्लोक लिहिलेले होते. हे श्लोक [[राम गणेश गडकरी]] यांनी सुचविले होते. श्लोक असे होते :-
;;;;परस्परविरोधिन्योरेकसंश्रय दुर्लभम्‌।<br />
;;;;संगतं श्रीसरस्वत्योर्भूतयेऽस्तु सदा सताम्‌॥१॥<br />
;;;;सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वोभद्राणि पश्यतु।<br />
;;;;सर्वः कामनावाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु॥२॥
 
 
५५,७२९

संपादने