"चोखामेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६२:
'शुद्ध चोखामेळा करे नामाचा सोहळा' अशी आपल्या नावामागे ते शुद्धत्वाची ग्वाही देऊन. देहभाव नष्ट झाल्याचे सांगतो. मेळा (अपवित्र) असणारा माणूसही भगवंताच्या दारी (चोख) पवित्र होतो. चोखोबांनी 'वाणी नाही शुद्ध | धड न ये वचन' असे आपल्या अभंगात म्हटले असले तरी, तो त्यांचा विनय आहे. त्यांची अभंगवाणी निर्दोष असलेली दिसते. व्याकरण, विवेचन आणि वाङ्‌मय या तीनही दृष्टीनी त्याची वाणी चोख आहे. उत्कटता, सामाजिक आशय, बांधीव रचना, या गुणांमुळे त्यांच्या अभंगाला मराठी सारस्वतात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
 
नामदेवप्रणीत भक्तियात्रेत संत चोखोबा, पत्‍नी [[सोयराबाई चोखामेळा|संत सोयराबाई]] , बहीण निर्मळा, पुत्र [[कर्ममेळा]] आणि मेहुणा बंका हे कुटुंबीय सहभागी झाले होते. नामदेवाप्रमाणे समग्र कुटुंबच भक्तिभावात एकरूप झाले दिसते.
 
==चोखोबांबद्दल संत बंका, संत [[नामदेव]] आणि संत [[तुकाराम]] यांची वचने==
"https://mr.wikipedia.org/wiki/चोखामेळा" पासून हुडकले